ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
बॅनर न्युज
...

लोकायुक्ताची गरज नाही, आम्हाला पूर्ण बहुमत - नागपूरच्या महापौर

नागपूर, दि. ६ - मुंबई महापालिकेत पारदर्शक कारभाराच्या नावावर लोकायुक्तांसाठी आग्रही असलेल्या भाजपने नागपुरात वेगळा न्याय लावण्याचा प्रयत्न केला आहे. भाजपला पूर्ण बहुमत असल्याने लोकायुक्तांची गरज नसल्याचा अजब तर्क नव्या महापौर नंदा जिचकार यांनी मांडला आहे.

नागपुरात पारदर्शी कारभारासाठी लोकायुक्तांची नियुक्ती होणार काय, या प्रश्नावर गडबडलेल्या नव्या महापौरांनी भाजपला संपूर्ण बहुमत असल्याचा तर्क मांडला. नागपुरात पारदर्शक कारभार करू, अशी हमीही त्यांनी दिली. सर्व विरोधी पक्षांना विश्वासात घेऊनच नागपूरचा विकास करू, असे आश्वासन त्यांनी या वेळी दिले. 

दरम्यान, रविवारी पार पडलेल्या निवडणुकीत नंदा जिचकार यांनी ८२ मतांनी काँग्रेसच्या नेहा निकोसे यांचा पराभव केला तर उपमहापौर पार्डीकर यांनी ८० मतांचे आधिक्य राखून काँग्रेसचे नितीश ग्वालबंशी यांना पराभूत केले. महापालिका निवडणुकीत १०८ जागा मिळवून भाजपने यंदा प्रथमच बहुमत मिळवले आहे.