ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
बॅनर न्युज
...

कुदळवाडीत भंगार गोदामांना आग, २५ दुकाने खाक

पिंपरी, दि. ६ - चिखलीमध्ये कुदळवाडी येथे काल (रविवार) रात्री साडेबाराच्या दरम्यान एका भंगारच्या गोदामाला भीषण आग लागली. या आगीत जवळजवळ २० ते २५ भंगारची दुकानं जळून खाक झाली आहेत. या आगीचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. चिखली परिसरात भंगारमालाची असंख्य गोडावून आहेत. वारंवार येथे आगीच्या घटना घडत असतात.

दरम्यान, आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलानं घटनास्थळी धाव घेतली असून अग्निशमन दलाच्या तब्बल १५ गाड्या आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत. गेल्या ५ तासापासून आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरु आहे. मात्र, अद्यापही ही आग विझलेली नाही.

दुकानातील भंगार सामानामुळे आग वाढत असून आता पुण्यातून दोन मोठे फायर इंजिन घटनास्थळी पाठवण्यात आले आहेत. दरम्यान, या आगीमुळं परिसरात मोठ्या प्रमाणात धुराचं साम्राज पसरलं आहे. त्यामुळे आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाकडून सध्या शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.