ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
बॅनर न्युज
...

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु

सरकार शेतकऱ्यांच्या विकासासाठी कटिबद्ध - राज्यपाल

मुंबई, दि. ६ - विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सोमवारी (6 मार्च) सुरुवात झाली. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या अभिभाषणाला सुरुवात झाली आहे. सरकार शेतकऱ्यांच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे राज्यपालांनी सांगितले आहे. राज्यातील ११ हजार गावे दुष्‍काळमुक्त झाल्याचे राज्यपाल यांनी सांगितले. तसेच कायदा व सु‍व्यवस्थेसाठी मुंबईसह प्रमुख शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहे. मागेल त्याला शेत तळे योजना सर्वाधिक लोकप्रिय ठरली आहे. राज्यात सर्वाधिक गुंतवणूक करण्यात आल्याचे राज्यपालांनी आपल्या अभिभाषणात‍ म्हटले आहे.

महाराष्ट्रातही शेतकर्‍यांना कर्जमाफी मिळालीच पाहिजे, या मागणीसाठी राज्याच्या आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात फडणवीस सरकारवर दबाव आणू, अशी भू्मिका विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मांडली आहे. दरम्यान, उत्तर प्रदेश निवडणूक प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची घोषणा केली होती. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेत्यांची रविवारी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना राधाकृष्ण पाटलांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी हाच आमचा प्रमुख विषय असल्याचे स्पष्ट केले.

विखे पाटलांची सरकारवर सडकून टीका
महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेच्या मंत्र्यांना अचानक शेतकऱ्यांचा कळवळा आला आणि त्यांनी कर्जमाफीची मागणी केली. मात्र, हे शिवसेनेचे वरवरचे प्रेम आहे. मराठवाड्यात मागील दोन महिन्यांत १७० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून सर्वोच्च न्यायालयानेही शेतकरी आत्महत्यांवरून सरकारला फटकारले आहे. यामुळे हीच कर्जमाफीची योग्य वेळ असून मुख्यमंत्री देंवेद्र फडणवीस यांनी आता पंचांग काढून मुहूर्त शोधण्याचे नाटक करू नये. नाहीतर भाजपच्या कुंडलीत देश सोडून पळून गेलेल्या मल्ल्याची पाठराखण करण्याचा योग होता, असे लोक बोलतील, असा टोलाही विखेंनी मारला.

राज्य सरकार शेतकरी आत्महत्या रोखण्यात अपयशी तर ठरले आहेच, पण राज्यातील गुन्हेगारीतही वाढ झाली आहे. असे असताना अधिवेशन आहे म्हणून सरकारचे चहापान घेण्यात पक्षांना अजिबात रस नाही. यामुळेच सरकारच्या चहापानावर आम्ही बहिष्कार घालत आहोत. विरोधकांची ताकद आम्ही अधिवेशनात दाखवून देऊ, असा आक्रमक पवित्रा विखे पाटील व मुंडे यांनी घेतला.