ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
बॅनर न्युज
...

शिवसेनेची तलवार ‘म्यान’; राजीनामे खिशातच सडले

विरोधकांनी घेतली राज्यपालांची भेट

मुंबई, दि. ६ - सत्तेत असूनही आजवर कर्जमाफीच्या मागणीसाठी सरकारला धारेवर धरणाऱ्या व खिशात राजीनामे घेऊन फिरणाऱ्या शिवसेनेने तूर्तास हा मुद्दा ‘म्यान’ केल्याचे दिसून येत आहे. 

दरम्यान, अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, धनंजय मुंडे यांच्यासह काँग्रेस- राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची भेट घेऊन त्यांना शेतकरी कर्जमाफीच्या मागणीचे निवेदन दिले. ‘शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी कर्जमाफी देण्याचे निर्देश सरकारला द्यावेत. राज्यपालांच्या अभिभाषणात कर्जमाफीबाबत घोषणा व्हावी,’ अशी मागणी विरोधकांनी केली आहे. 

राज्याचा अर्थसंकल्प येत्या १८ मार्चला सादर होईल. त्यात कृषी आधारित रोजगारावर भर राहील, अशी माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. राज्यात एकूण ४ कोटी ५५ लाख मजूर आहेत. त्यापैकी २ कोटी ६० लाख शेतीशी संबंधित आहेत. त्यामुळे कृषीआधारित रोजगार निर्मितीवर भर राहील.

शिवसेना-भाजपतील वाढत्या तणावाचा फायदा घेत राज्यातील सरकार अस्थिर करण्याचे डावपेच विरोधकांनी आखले होते. मात्र अधिवेशनाच्या दोन दिवस आधीच सत्ताधारी मित्रपक्षांमधला तणाव निवळल्याने हे संकट आता दूर झाले आहे. परिस्थितीचा अंदाज आल्यामुळे सरकारवर अविश्वास ठराव आणणार नसल्याचे जाहीर करण्याची वेळ विरोधकांवर आली आहे.