ब्रेकिंग न्यूज
उल्हासनगर : रेल्वे स्टेशनबाहेर वडापावच्या दुकान मालकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, चंदरलाल रामरखियानी 100 % भाजले      पाकिस्तानात बेपत्ता झालेले दोन्ही मौलवी भारतात परतले      बेळगावात ड्राय डेच्या दिवशी दारु न दिल्याने पोलिसांची हॉटेल मॅनेजरला लाथा-बुक्क्यांनी मारहाण      नागपूरमध्ये राजू शेट्टी यांचे स्टेट बँक इंडियाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन      पतीची हत्या करुन मृतदेह बीएमडब्ल्यू गाडीत लपवला, पत्नीविरोधात गुन्हा दाखल, पंजाबमधील घटना      उत्तरप्रदेशमध्ये बहुजन समाज पक्षाचे नेते मोहम्मद समी यांची भररस्त्यात हत्या      छत्तीसगडमधील दंतेवाडामधूल पाच नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा हस्तगत      महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना फसवणारा, जनतेला गाजर दाखवणारा अर्थसंकल्पः जयंत पाटील      जळगाव : शहरापासून जवळच असलेल्या भादली गावात मध्यरात्री एका कुटुंबातील चौघांची चोरटयांनी हत्या केली.      मुंबईने गमावला मतदानाचा अधिकार, ईशान्य भारतातील राज्यांना मिळाला BCCI मध्ये मतदानाचा हक्क
बॅनर न्युज
...

कडक उन्हाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्याल?

न्हाळा म्हटलं की सर्वसाधारणपणे ज्यांची त्वचा गोरी आहे अशांनीच काळजी घ्यायला हवी असा एक समज आढळतो. उन्हाच्या तीव्र झळांमुळे केवळ रंगच नव्हे तर त्वचेचा पोत खराब होणे, सावळी त्वचा रापणे, घाम-अस्वच्छतेमुळे त्वचेच्या रंध्रांमध्ये इन्फेक्शन होणे, त्वचा कोरडी पडणे, त्वचेवर अकाली सुरकुत्या पडणे या समस्याही सर्वांना होऊ शकतात. त्वचेची काळजी हा स्त्री पुरुषांसाठी कॉमन फॅक्टर असल्याने सर्वांनीच त्वचेची काळजी विशेषत: उन्हाळ्यात घ्यायला हवी. 

आपल्याला नाय काय फरक पडत, उन्हातान्हातून फिरलो तरी असं म्हणून फुशारक्या मारणारी मंडळी मग जेव्हा अकाली वृध्द दिसू लागली की मग हे क्रिम लाव ते लोशन लाव असले प्रकार करताना दिसतात. समवयस्कांमध्ये आपण तरुण, फ्रेश दिसायला हवंच असं तुम्हाला वाटत असेल तर काळजी नक्की घ्या. यामुळे उन्हाळ्यातण तुम्ही छान दिसू शकता.

१) आपली त्वचेत अनेक सुक्ष्म रंध्रे असतात. तुमची त्वचा जितकी स्वच्छ, मोकळी असेल तेवढे त्वचेचे आरोग्य उत्तम. स्त्रियांनी उन्हाळ्यात शक्यतो गडद मेक-अप करणे टाळावे. मेक-अपमुळे त्वचेची रंध्रे बंद होत असल्याने त्वचेला एक विचित्र कोरडेपणा येतो. दिर्घकाळ रंध्रे बंद राहीली तर, एखाद्या बंदिस्त खोलीप्रमाणे त्वचेचीही घुसमट होते व पोत बिघडायला सुरुवात होते. मेक-अप केल्यानंतर आळस टाळून तो आठवणीने काढायला हवा. क्लिन्झर्स लावुन मेक-अप काढुन त्वचा स्वच्छ धुवुन मग साधे मॉईश्चरायझर लावुन ठेवा.

2) दिवसातून किमान चार वेळा थंड पाण्याने अलगदपणे चेहरा-मानेच्या त्वचेवर हबकारे मारल्याने त्वचा टवटवीत होते, त्यानंतर मऊ कापडाने किंवा टॉवेलने ती हलकेच टिपून घ्यावी, खसाखसा चोळू नये.

३) आठवड्यातुन एकदा तासभर वेळ काढून वस्त्रगाळ चंदन पावडर २ चमचे, गुलाबपाणी ३ चमचे आणि चमचाभर मुलतानी माती यांचे एकत्र मिश्रण करुन त्याने फेशिअल घरच्या घरी केलंत तरी त्वचेचा पोत सुधारुन चेहरा फ्रेश होतो. पंधरा दिवसांतून एकदा तरी उत्तम मसाज क्रीम आणून त्वचेला घरच्या घरी व्यवस्थितपणे मसाज करणे खूपच चांगले. मसाजमुळे त्वचेखालचे रक्तसंचालन उत्तम रहाते. मसाज हलक्या हाताने गोलाकार करावा.

४) कडक उन्हाचे त्वचेवरील दुष्परिणाम टाळण्यासाठीचा रामबाण उपाय म्हणजे फक्त पिकलेल्या टॉमेटोचा गर काढून त्याने संपूर्ण चेहरा, मान, हात यावर एक हलकासा थर देऊन पंधरा मिनिटांनी तो स्वच्छ धुवून टाकला तरी त्वचेचे रापणे (टॅनिंग) कमी होते.

५) उन्हाळ्यात जंकफूड, मसालेदार पदार्थ, मद्यपान टाळणे. मांसाहार करत असाल तर तो अगदी माफक प्रमाणात करणे, आहारात अधिकाधिक द्रवपदार्थांचा समावेश केल्यानेही खूप फरक पडतो. उन्हाळ्यात दुधी, पालक, कोबी, टॉमेटो यांचे सेवन हितकर आहे. द्रवपदार्थांत ताक, लिंबुपाणी, पन्हे, कोकम सरबत, आवळा सरबत अशा क्षुधानाशक द्रव्यांचे सेवन हे त्वचेबरोबर आरोग्यासही अत्यंत लाभदायक आहे.

६) शक्य असेल तर दुपारी १२ ते ४ यावेळात घराबाहेर पडणेच टाळावे. दुपारचा आहार माफक असावा (सध्या आंब्यांचा सिझन असल्याने ते शक्य नाही पण तरीही आहारावर किंचित मर्यादा असू देणे.) उन्हाळ्यात नैसर्गिकरित्याच पचनयंत्रणा मंद होत असल्याने जडान्न, अतीगोड पदार्थ, मिठाया, मटनासारखे जड अन्न यांचा अतिरेक टाळावा. कोल्ड्रिंकने तुमच्या त्वचेवर विपरित परिणाम होतो असं माझं मत आहे. त्यात कार्बन डायॉस्काईडचे प्रमाण जास्त असल्याने जठरातील पचनास आवश्यक असणारा प्राणवायू कमी होतो व एकंदरीतच यकृत, आतडे यांची कार्यक्षमता मंदावते. प्रत्येक शीतपेयात साखरेचे प्रमाण अवास्तव असल्याने त्याचा इतर अवयवांवरही परिणाम होतो.

७) सध्या सनस्क्रिन किंवा सनब्लोक क्रिम चांगली उपलब्ध आहेत त्यातील ज्यांचा पीएसएफकिमान १५ आहे अशी क्रिम्स वापरणे केव्हाही उत्तम.

केसांसाठी
१. केसांना मेंदी कंडीशनरचे काम करते. त्यासाठी १५ दिवसांतून एकदा केसांना मेंदी लावली पाहिजे. तसेच महिन्यातून एकदा केसांना अंडे व दही लावले पाहिजे.
२. महिन्यातून एकदा बेसनए दही व लिंबाचा रस समप्रमाणात घेउन त्याने केसांच्या मुळाशी मसाज केला पाहिजे.
३. १ वाटी मेंदीत आवळा, शिकेकाई, रिठा, कडुनिंब, तळशीची पाने प्रत्येकी 1/1 चमचा  घेउन दह्यात भिजवणे. त्यात अर्धे लिंबू पिळून टाकणे. ठम केसांना लाउन 1 तास ठेवावे. यामुळभे केसांना चमक येते व केस मजबूत बनतात.
४. जरा गरम पाणीर घेउन त्यात लिंबाचा रस टाकून त्याने केस धुवावे. कोरड्या केसामध्या एक वेगळीच चमक येउन ते मऊ होतील.