ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
बॅनर न्युज
...

मुक्ता टिळक होणार पुण्याच्या महापौर

श्रीनाथ भिमाले गटनेते होणार

पुणे, दि. ६ - भारतीय जनता पक्षाच्या मुंबईत रविवारी झालेल्या बैठकीत पुण्याच्या महापौर पदासाठी ज्येष्ठ नगरसेविका मुक्ता टिळक यांचे नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. त्याचबरोबरच गटनेतेपदी श्रीनाथ भिमाले यांचे नावही निश्चित झाले आहे.

महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला घवघवीत यश मिळाले. एकूण १६२ पैकी ९८ जागांवर विजय मिळवित पक्षाने स्पष्ट बहुमत मिळविले. विरोधी पक्षनेते पद वगळून अन्य सर्व पदेही भाजपला मिळणार असल्यामुळे महापौर, उपमहापौर पदासह, स्थायी समिती या महत्त्वाच्या पदासाठी पक्षातील इच्छुकांमध्ये जोरदार चुरस निर्माण झाली होती. महापौर पदासाठीचे आरक्षण हे खुल्या महिला सर्वसाधारण गटासाठी पडले होते. भाजपकडूनही येत्या दोन दिवसांमध्ये नावनिश्चिती करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले होते. त्यानुसार मुंबई येथे झालेल्या बैठकीत महापौर पदासाठी टिळक यांचे, तर गटनेते पदासाठी श्रीनाथ भिमाले यांचे नाव निश्चित करण्यात आल्याची माहिती भाजपच्या सूत्रांकडून देण्यात आली. 

महापौरपदाच्या या अडीच वर्षांच्या कार्यकाळासाठी ज्येष्ठ नगरसेविका मुक्ता टिळक यांच्याबरोबरच रंजना टिळेकर, मानसी देशपांडे, माधुरी सहस्त्रबुद्धे, वर्षां तापकीर यांची नावे चर्चेत होती. निवडणुकीनंतर भाजपने पुरस्कृत केलेल्या अपक्ष उमेदवार रेश्मा भोसले यांना महापौर पदावर बसविण्यासाठी सहयोगी खासदार संजय काकडे यांनी हालचाली सुरु केल्या होत्या. त्यामुळे पक्षात काही काळ नाराजी व्यक्त होत होती. यातच काकडे यांनीही टिळक यांच्या नावाला पाठिंबा दिला होता.  मुक्ता टिळक या लोकमान्य टिळक यांचे पणतू शैलेश टिळक यांच्या पत्नी आहेत.

गटनेतेपदी राज्यमंत्री दिलीप कांबळे यांचे बंधू सुनील कांबळे, श्रीनाथ भिमाले, हेमंत रासने यांची नावे चर्चेत होती. टिळक या चौथ्यांदा महापालिकेत निवडून गेल्या असून यापूर्वी त्यांनी गटनेते म्हणूनही काम पाहिले आहे. महापौर पदासाठी येत्या पंधरा मार्च रोजी निवडणूक होणार असून आठ मार्चपासून उमेदवारी अर्जाची स्वीकृती करण्यात येणार आहे.