ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
बॅनर न्युज
...

भाजपच्या गटनेतेपदी एकनाथ पवार यांची निवड

पिंपरी, दि. ६ – पिंपरी-चिंचवड महापालिकेत प्रथमच सत्ताधारी बनलेल्या भारतीय जनता पक्षाच्या गटनेतेपदी एकनाथ पवार यांची निवड करण्यात आली आहे. पक्षाच्या आदेशानुसार शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी ही निवड केली आहे. त्यामुळे भोसरी विधानसभा मतदारसंघाला सत्तारूढ पक्षनेतेपद मिळाले आहे.

एकनाथ पवार हे प्रभाग क्रमांक ११, कृष्णानगर-कोयनानगर-अजंठानगरमधून निवडून आले आहेत. २००७ मध्ये ते भाजपचे स्वीकृत नगरसेवक होते. पवार यांनी भाजपचे शहराध्यक्ष म्हणूनही काम केले आहे. 

आता ते नगरसेवक म्हणून दुसऱ्यांदा महापालिकेच्या सभागृहात आले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या सूचनेनुसार पक्षाचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी एकनाथ पवार यांची गटनेतेपदी निवड केली आहे.

निवडीनंतर एकनाथ पवार म्हणाले की, “पक्षाने प्रामाणिकपणाचे फळ म्हणून आपली गटनेतेपदी निवड केली आहे. शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांच्यामुळे महापालिकेत सत्ता परिवर्तन घडविण्यात भाजपला यश आले. त्यांच्या मार्गदर्शनानुसार यापुढे शहरातील नागरिकांची सेवा करण्याचा आपला प्रयत्न राहील. नागरिकांना सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच शहराला देशातील प्रथम क्रमांकाची स्मार्ट सिटी बनविण्यासाठी पदाचा उपयोग करेन.”