ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
बॅनर न्युज
...

निवडणुकांमध्ये भाजपने केला साधन-संपत्तीचा वापर - शरद पवार

ठाणे, दि. ७ – केंद्र आणि राज्यात सत्तेवर असलेल्या भाजपने राज्यात नुकत्याच झालेल्या महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये साधन-संपत्तीचा वापर केल्याचा आरोप राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकारांशी बोलताना केला. 

तसेच निवडणुकीत पराभव झाल्यानंतर मतदार यादी आणि मतदान यंत्रामध्ये घोळ या सर्वाला दोष देण्यात काहीच अर्थ नसतो. पराभव हा पराभवच असतो. त्यामुळे आम्ही पराभव मान्य करून त्यामागची कारणे शोधण्यास सुरुवात केली आहे. त्याचप्रमाणे अडीच वर्षांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांची तयारी सुरू केली आहे, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले. भाजप आणि शिवसेना यांच्यातील ऐक्य जितके दिवस टिकेल, तितके दिवस राज्यातील सरकार टिकेल, असे ते म्हणाले.

राष्ट्रवादी पक्षाने ठाणे महापालिका निवडणुकीनंतर आयोजित केलेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीसाठी शरद पवार ठाण्यात आले होते. या बैठकीपूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना भाजपावर टीका केली. निवडणुकांमध्ये राज्यात सत्तेवर असलेल्या भाजपने साधन-संपत्तीचा मोठय़ा प्रमाणात वापर केला असून पहिल्यांदाच निवडणुकांमध्ये असा प्रकार घडला. 

साधन-संपत्तीचा वापर करूनही जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली आहेत. या निवडणुकीत भाजपला मिळालेल्या एकूण मतांपेक्षा सुमारे चार लाख मते राष्ट्रवादीला कमी मिळाली आहेत, त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचा आजही राष्ट्रवादीला पाठिंबा आहे, असेही पवार म्हणाले.

जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये समविचारी पक्ष एकत्र आले तर जिल्हा परिषदांमध्ये वेगळे चित्र दिसेल. त्यामुळे समविचारी पक्षांनी एकत्र यावे म्हणून त्यांच्यासोबत काँग्रेसच्या नेत्यांसोबत बैठका सुरू आहेत. जिल्हा परिषदांमध्ये दोन्ही पक्ष एकत्र येण्याबाबत लवकरच निर्णय होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.