ब्रेकिंग न्यूज
उल्हासनगर : रेल्वे स्टेशनबाहेर वडापावच्या दुकान मालकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, चंदरलाल रामरखियानी 100 % भाजले      पाकिस्तानात बेपत्ता झालेले दोन्ही मौलवी भारतात परतले      बेळगावात ड्राय डेच्या दिवशी दारु न दिल्याने पोलिसांची हॉटेल मॅनेजरला लाथा-बुक्क्यांनी मारहाण      नागपूरमध्ये राजू शेट्टी यांचे स्टेट बँक इंडियाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन      पतीची हत्या करुन मृतदेह बीएमडब्ल्यू गाडीत लपवला, पत्नीविरोधात गुन्हा दाखल, पंजाबमधील घटना      उत्तरप्रदेशमध्ये बहुजन समाज पक्षाचे नेते मोहम्मद समी यांची भररस्त्यात हत्या      छत्तीसगडमधील दंतेवाडामधूल पाच नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा हस्तगत      महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना फसवणारा, जनतेला गाजर दाखवणारा अर्थसंकल्पः जयंत पाटील      जळगाव : शहरापासून जवळच असलेल्या भादली गावात मध्यरात्री एका कुटुंबातील चौघांची चोरटयांनी हत्या केली.      मुंबईने गमावला मतदानाचा अधिकार, ईशान्य भारतातील राज्यांना मिळाला BCCI मध्ये मतदानाचा हक्क
बॅनर न्युज
...

कंटेनर उलटल्याने द्रुतगती मार्गावरील वाहतूक विस्कळीत

लोणावळा, दि. ७ - पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनर चालकाचे नियंत्रण सुटल्याने कंटेनर घाटातच उलटला. हा अपघात आज सकाळी साडे आठच्या सुमारास अमृतांजन पुलाखाली झाला. या अपघातामुळे मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक दोन तास विस्कळीत झाली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुण्याकडून मुंबईच्या दिशेने कंटेनर (क्र.एम.एच.04 एचडी 9871) जात होता. कंटेनर चालकाचा ताबा सुटल्याने अमृतांजन पुलाच्या कठड्याला धडकून तो रस्त्याच्या मधोमध पलटी झाला. या अपघातात कंटेनर चालकाला किरकोळ मार लागला. मात्र कंटेनर अमृतांजन पुलाच्या बरोबर खाली रस्त्याच्या मधोमध आडवा झाल्याने या मार्गाने मुंबईकडे जाणाऱ्या दोन लेन वाहतुकीस पूर्ण बंद झाल्या. त्यामुळे  मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली. 

खंडाळा आणि बोर घाट महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी येऊन एका लेनची मुंबईकडे जाणारी वाहतूक सुरु केली. तर दुसरीकडे वळवण गावातील सेंटर पॉईंट येथून द्रुतगती मार्गावरील वाहतूक जुन्या मुंबई पुणे महामार्गाने मुंबईच्या दिशेने वळविण्यात आली. यामुळे लोणावळा शहरातही लोणावळेकर नागरिकांना आणि प्रवाशांना काही काळ या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला.

महामार्ग पोलिसांनी अकराच्या सुमारास अपघातग्रस्त कंटेनर एक पुलर आणि एका क्रेनच्या मदतीने महामार्गावरून बाजूला करून वाहतूक पूर्ववत करण्यात आली.