ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
बॅनर न्युज
...

कांगारूंवर टिम इंडियाचा ७५ धावांनी विजय

बंगळुरू, दि. ७ - भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरी कसोटी भारताने ७५ धावांनी जिंकली आहे. या विजयाबरोबरच भारताने पुण्यातील पराभवाचा वचपा काढत मालिकेत १-१ ने बरोबरी केली आहे. भारताने ऑस्ट्रेलियाला बंगळुरू कसोटी जिंकण्यासाठी १८८ धावांचे आव्हान दिले होते. मात्र कांगारूंचा संपूर्ण संघ ११२ धावांत गुंडाळला गेला. अशिवनने सहा विकेट घेतल्या. तर उमेश यादवने २ आणि इशांत शर्मा तसेच रवींद्र जडेजाने प्रत्येकी एक विकेट घेतली.

टीम इंडियाचा दुसरा डाव आज २७४ धावांवर आटोपला. त्यामुळे ऑस्ट्रेलियापुढे विजयासाठी १८८ धावांचं आव्हान होतं. ते सोप नव्हतं, पण कठीणही नव्हतं. जवळपास पावणे दोन दिवसांचा खेळ शिल्लक असल्याने स्मिथ कंपनीचंच पारडं जड वाटत होतं. भारताची मदार अश्विन-जडेजा जोडीवर होती. त्यांची फिरकी संघाला तारेल, अशा आशा होती. अश्विननं अजिबात निराश केलं नाही. त्यानं ४१ धावांत सहा जणांना तंबूचा रस्ता दाखवला आणि ११२ धावांवरच ऑस्ट्रेलियाचा खुर्दा पडला. भारतानं ७५ धावांनी नाट्यमय विजयाची नोंद केली. कांगारूंच्या शेवटच्या सहा विकेट्‌स तर अवघ्या ११ धावांत गेल्या.