ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
बॅनर न्युज
...

चाकण-आळंदी रोडवर अपघात; एक ठार, चारजण जखमी

अपघातात ज्ञानेश्वर लेवडे महाराजांचा दुर्दैवी मृत्यू

चाकण, दि. ७ - चाकणकडून आळंदीच्या दिशेने जाणाऱ्या एका कारला विरुद्ध बाजून येणाऱ्या टेम्पोची जोरदार धडक बसली. या अपघातात आळंदी येथील विद्यार्थ्यांना धार्मिक आणि आध्यात्मिक शिक्षण देणारे ज्ञानेश्वर लेवडे महाराज यांचा जागीच मृत्यू झाला. तर कारमधील चारजण अल्पवयीन मुले गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात काल (रविवार) रात्री साडे नऊच्या सुमारास चाकण आळंदी रोडवरील हॉटेल निवांतसमोर झाला.

ज्ञानेश्वर बाबुराव लेवडे ( वय-50, रा. आळंदी, देहूफाटा) असे मृत्यू झालेल्या इसमाचे नाव आहे. तर एकनाथ ज्ञानेश्वर लेवडे (वय-13), निश्पू वैजनाथ नागरे (वय-14), चैतन्य सुरेश चव्हाण (वय-11)  नवनाथ बाबासाहेब पारधे ( वय-14, सर्व रा. आळंदी, देहूफाटा) असे अपघातात जखमी झालेल्या चार अल्पवयीन मुलांची नावे असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मोहन बाबुराव लेवडे (वय-42) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी टेम्पो चालक वैजनाथ कैलास खाडे ( वय -27, रा. आळंदी, मूळ रा. बीड ) याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  काल रात्री साडे नऊच्या सुमारास ज्ञानेश्वर लेवडे हे त्यांच्या झेन मोटारने (एमएच 12 एएन 9876) आळंदी फाटा येथून आळंदीकडे जात होते. हॉटेल निवांतसमोर त्यांच्या गाडीला चुकीच्या बाजूने येणाऱ्या भरधाव आयशर टेंम्पोची धडक बसली. या अपघातात लेवडे यांचा जागीच मृत्यू झाला. तर याच मोटारीत बसलेली चार अल्पवयीन मुले गंभीर जखमी झाली असून, त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. पुढील तपास चाकण पोलीस करीत आहेत.

चाकण रोडवर अनेक कंपन्या असल्याने या ठिकाणी वाहनांची वर्दळ नेहमीच असते. कंपन्यांमध्ये जाणारी वाहने किंवा कंपनीतून बाहेर पडणारी वाहने ही चुकीच्या मार्गाने येत असतात. त्यामुळे या मार्गावर नेहमीच अपघात होत असतात. वाहनचालक वाहतुकीचे नियम पायदळी तुडवून वाहन चालवत असल्याने अनेक अपघात होऊन अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर काहींना अपंगत्व आले आहे. या मार्गावर वाहतूक पोलिसांकडून कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसल्याने वाहनचालक बेफिकरपणे वाहने चालवतात. पोलिसांकडून वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई करून त्यांच्यावर जरब बसवावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.