ब्रेकिंग न्यूज
उल्हासनगर : रेल्वे स्टेशनबाहेर वडापावच्या दुकान मालकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, चंदरलाल रामरखियानी 100 % भाजले      पाकिस्तानात बेपत्ता झालेले दोन्ही मौलवी भारतात परतले      बेळगावात ड्राय डेच्या दिवशी दारु न दिल्याने पोलिसांची हॉटेल मॅनेजरला लाथा-बुक्क्यांनी मारहाण      नागपूरमध्ये राजू शेट्टी यांचे स्टेट बँक इंडियाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन      पतीची हत्या करुन मृतदेह बीएमडब्ल्यू गाडीत लपवला, पत्नीविरोधात गुन्हा दाखल, पंजाबमधील घटना      उत्तरप्रदेशमध्ये बहुजन समाज पक्षाचे नेते मोहम्मद समी यांची भररस्त्यात हत्या      छत्तीसगडमधील दंतेवाडामधूल पाच नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा हस्तगत      महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना फसवणारा, जनतेला गाजर दाखवणारा अर्थसंकल्पः जयंत पाटील      जळगाव : शहरापासून जवळच असलेल्या भादली गावात मध्यरात्री एका कुटुंबातील चौघांची चोरटयांनी हत्या केली.      मुंबईने गमावला मतदानाचा अधिकार, ईशान्य भारतातील राज्यांना मिळाला BCCI मध्ये मतदानाचा हक्क
बॅनर न्युज
...

नोटाबंदीत पिंपरीमध्ये तीनशेहून अधिक कोटय़धीशांकडून संशयास्पद व्यवहार

पिंपरी, दि. ७ - नोटाबंदीच्या काळात अडीच लाखांपेक्षा जास्त रक्कम बँकेच्या खात्यात भरणाऱ्या नागरिकांची चौकशी सुरू करण्यात आली असून, पिंपरी-चिंचवडमधील तीनशेहून अधिक कोटय़धीशांनी नोटाबंदीच्या काळात संशयास्पद व्यवहार केल्याची माहिती समोर आली आहे. या सर्वाची चौकशी सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत संशयास्पद व्यवहार करणाऱ्या २३ जणांवर आयकर विभागाकडून छापे टाकण्यात आले आहेत.

नोटाबंदीच्या काळातील संशयास्पद व्यवहारांबरोबरच जनधन खात्यामध्ये पैसे भरून जुन्या नोटा बदलून घेतलेल्यांवरही लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. नोटाबंदीच्या काळातच नव्हे, तर यापुढेही अडीच लाखांपेक्षा जास्त रक्कम बँक खात्यात भरणाऱ्या नागरिकांवर, तसेच पाच लाखांपेक्षा जास्त रक्कम भरणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांच्या खात्यांचीही आयकर विभागाकडून चौकशी केली जाणार आहे. बेनामी संपत्ती जमा करणाऱ्यांवरील कारवाईला आयकर विभागाने सुरुवात केली आहे.

एक हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटा ८ नोव्हेंबर रोजी चलनातून बाद करण्यात आल्यानंतर अनेक नागरिकांनी दिलेल्या मुदतीमध्ये जुन्या नोटा बदलून घेतल्या होत्या. मात्र, काही नागरिकांनी जुन्या नोटा बदलताना मोठय़ा रकमेचे व्यवहार केले. अडीच लाखांपेक्षा जास्त रकमेचे व्यवहार करणाऱ्या नागरिकांवर आयकर विभागाने लक्ष केंद्रित केले होते. पहिल्या टप्प्यात कोटय़वधी रुपयांचे संशयास्पद व्यवहार करणाऱ्या नागरिकांची चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती अशी माहिती आयकर विभागाच्या सूत्रांकडून मिळाली आहे. पिंपरी-चिंचवडमधील तीनशेपेक्षा जास्त नागरिकांनी एक कोटीपेक्षा जास्त रकमेच्या पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा बदलून घेतल्या आहेत.