ब्रेकिंग न्यूज
उल्हासनगर : रेल्वे स्टेशनबाहेर वडापावच्या दुकान मालकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, चंदरलाल रामरखियानी 100 % भाजले      पाकिस्तानात बेपत्ता झालेले दोन्ही मौलवी भारतात परतले      बेळगावात ड्राय डेच्या दिवशी दारु न दिल्याने पोलिसांची हॉटेल मॅनेजरला लाथा-बुक्क्यांनी मारहाण      नागपूरमध्ये राजू शेट्टी यांचे स्टेट बँक इंडियाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन      पतीची हत्या करुन मृतदेह बीएमडब्ल्यू गाडीत लपवला, पत्नीविरोधात गुन्हा दाखल, पंजाबमधील घटना      उत्तरप्रदेशमध्ये बहुजन समाज पक्षाचे नेते मोहम्मद समी यांची भररस्त्यात हत्या      छत्तीसगडमधील दंतेवाडामधूल पाच नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा हस्तगत      महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना फसवणारा, जनतेला गाजर दाखवणारा अर्थसंकल्पः जयंत पाटील      जळगाव : शहरापासून जवळच असलेल्या भादली गावात मध्यरात्री एका कुटुंबातील चौघांची चोरटयांनी हत्या केली.      मुंबईने गमावला मतदानाचा अधिकार, ईशान्य भारतातील राज्यांना मिळाला BCCI मध्ये मतदानाचा हक्क
बॅनर न्युज
...

सरकारकडून रक्तदात्यांच्या अल्पोपहाराकडे अक्षम्य दुर्लक्ष

पुणे, दि. ३ (प्रतिनिधी) - केंद्र व राज्य शासनाकडून रक्तदान वाढवण्यासाठी विविध उपक्रमांवर कोटय़वधींचा खर्च केला जातो. परंतु रक्तदात्यांच्या अल्पोपहाराकडे मात्र दुर्लक्ष होत आहे. महागाईच्या काळात अल्पोपहाराचा खर्च वाढला असताना शासन मात्र प्रति व्यक्ती केवळ १० रुपयेच देऊन रक्तदात्यांसह रक्तपेढींची बोळवण करत आहे.

अपघात, विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया, रक्ताचा कर्करोग, सिकलसेल वा गंभीर स्वरूपातील अनेक रुग्णांना उपचारादरम्यान रक्ताची मोठय़ा प्रमाणावर गरज भासते. रुग्णांना लागणाऱ्या रक्ताच्या तुलनेत भारतात आजही होणाऱ्या रक्तदानाची संख्या कमी आहे. केंद्र व राज्य शासनाने गेल्या काही वर्षांत प्रामाणिक प्रयत्न करीत रक्तदान वाढवण्याकरिता प्रत्येक वर्षी मोठय़ा प्रमाणावर खर्च केला जात आहे. त्यामुळे रक्तदान काही प्रमाणात वाढले. रक्तदानाची चळवळ राबवण्यात शासकीयसह अनेक सामाजिक संस्थांच्या रक्तपेढींची भूमिकाही महत्त्वाची आहे. परंतु काही खासगी रक्तपेढींकडून या रक्ताचाही अव्वाच्या सव्वा दरात विक्री करून व्यवसाय मांडण्यात आला आहे.

शासनाने नागरिकांना कमी दरात दर्जेदार रक्त मिळावे, सोबत रक्तदान केल्यावर रक्तदात्यांची प्रकृती चांगली राहावी म्हणून बरेच नियम घालून दिले आहे. परंतु रक्तदात्यांच्या अल्पोपहाराला शासकीय नियमांचा फटका बसत आहे. शिबिरासह रक्तपेढीत कुणी रक्त दिल्यास त्या रुग्णांना अशक्तपणा येऊ नये म्हणूण अल्पोपहार व चहा मिळायला हवा. शासनाकडून त्याकरिता पुरेसा खर्च मिळणे अपेक्षित आहे. परंतु शासनाने सन १९९४ पासून या खर्चात प्रती व्यक्ती १० रुपयांहून वाढ केली नाही. त्यामुळे महागाईच्या काळात या दरात नास्तासह चहा मिळणे शक्य नसल्याने शासकीय व सामाजिक संस्थांच्या रक्तपेढीला आर्थिक मदतीकरिता विविध दानशुरांच्या दारावर मदत मागण्याकरिता जावे लागत आहे. रक्तदात्याला अशक्तपणा येऊन काही बरे-वाईट झाल्यास जबाबदार कोण? असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. 

शहरात सध्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल), इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो), सुपरस्पेशालीटी रुग्णालय, डागा शासकीय स्मृती रुग्णालय येथे शासकीय तर डॉ. हेडगेवारसह अनेक सामाजिक संस्थांच्या रक्तपेढीत नागरिकांना रक्त उपलब्ध करून दिले जाते.