ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
बॅनर न्युज
...

बचतगटांना वाहनतळाचे कंत्राट देण्याचा प्रस्ताव धूळखात

पिंपरी, दि. ८ (प्रतिनिधी) - पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील सशुल्क वाहनतळ (पे अँड पार्क) योजनेची कंत्राटे महिला बचतगटांना देण्याचा निर्णय महिला व बालकल्याण समितीने घेतला होता. त्यासाठी केरळचा दौरा करत त्याच धर्तीवर हा उपक्रम राबविण्याचे प्रस्तावित करण्यात आले होते. मात्र, राजकीय उदासिनतेमुळे हा प्रस्ताव धूळखात पडला आहे. 

मागील पंचवार्षिकमध्ये महिला व बालकल्याण समिती सभापती गीता मंचरकर यांनी समितीचा केरळ येथे अभ्यास दौरा काढला होता. केरळमध्ये महिला बचतगटांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी तेथील वाहनतळ बचतगटांना चालविण्यास देण्यात आले आहेत. याखेरीज नारळाच्या झाडापासून विविध वस्तू तयार करुन त्यासाठी बचतगटांना उपलब्ध करुन दिली जाते. हे उपक्रम पिंपरी महापालिकेच्या महिला व बालकल्याण समिती सदस्यांच्या पसंतीस उतरले. मात्र, केरळमध्ये नारळाची झाडे सहजगत्या उपलब्ध होतात. पिंपरी-चिंचवडमध्ये ही अशक्‍य बाब असल्याने बचतगटांना वाहनतळ चालविण्यास देण्याची योजना प्रत्यक्षात आणण्याचा संकल्प महिला व बालकल्याण समितीने सोडला. समितीच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देखील देण्यात आली. मात्र, पुढे काहीही झाले नाही. 

देशातील अन्य शहरांच्या तुलनेत पिंपरी-चिंचवडमधील लोकसंख्या वाढीचा वेग सर्वाधिक आहे. लोकसंख्येसोबतच वाहनांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीत महिला बचत गटांना पे अँड पार्क योजनेतील वाहनतळ चालविण्यास दिल्यास त्यांना कायमस्वरुपी चांगल्या पध्दतीचा रोजगार मिळू शकेल. शहरात सुमारे बारा हजार नोंदणीकृत बचतगट आहेत. महापालिकेच्या मिळकती, रुग्णालये तसेच शहरातील विविध भागात सुमारे १८ वाहनतळ आहेत. त्यापैकी काही वाहनतळ कंत्राटी पध्दतीने खासगी ठेकेदारांना चालविण्यास देण्यात आले आहेत. 

भविष्यात महापालिकेकडून मोक्‍याच्या अन्य काही ठिकाणी सशुल्क वाहनतळ सुरु करण्याचे प्रस्तावित आहे. त्यामुळे वाहनतळांच्या कंत्राटाच्या माध्यमातून महिला बचतगटांसाठी रोजगाराचा चांगला पर्याय उपलब्ध होणार आहे. महापालिकेत सत्तांतर झाले आहे. त्यामुळे परिवर्तनाची दवंडी पिटणाऱ्या भाजपच्या कारभाराकडे महिला बचतगटांचे लक्ष लागले आहे.