ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
बॅनर न्युज
...

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादीचे आंदोलन

मुंबई, दि. ८ - काँग्रेस, राष्ट्रवादीने शेतकर्‍यांच्या कर्जमाफीसाठी विधानसभेच्या पायर्‍यांवर बसून आंदोलन केले. सरकारविरोधात घोषणा दिल्या. राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अजित पवार हे विधानसभेत आक्रमक दिसून आले. सभागृहातही विरोधकांनी शेतकर्‍यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावर सरकारला घेरले. विरोधक शांत न झाल्याचे सभापतींनी विधानसभेचे कामकाज १५ मिनिटांसाठी तहकूब करण्यात केले.

राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अजित पवार हे विधानसभेत आक्रमक दिसून आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकर्‍यांनी कर्जमाफीची घोषणा केली आहे. महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना कर्जमाफी का नाही? असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला आहे. 'चंद्रकांतदादा कर्जमाफीची घोषणा करा, आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री बनवू, तुम्हाला डोक्यावर घेऊ,' असेही पवार यांनी यावेळी म्हटले.

दरम्यान, दिवाकर रावते पायऱ्यांवरून जात असताना ‘कुठे गेले कुठे गेले, राजीनामे कुठे गेले.’ अशा घोषणा करत विरोधकांनी शिवसनेला डिवचलं आहे.

दुसरीकडे आमदार परिचारकांची आमदारकी रद्द करण्यात यावी यासाठीही घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीही विधानपरिषदेत आमदार प्रशांत परिचारक यांना तात्काळ निलंबित करावं, अशी मागणी भाजप वगळता सर्वपक्षीय आमदारांनी केली.