ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
बॅनर न्युज
...

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या गटनेतेपदी राष्ट्रवादी काँग्रेसकडून योगेश बहल यांची निवड

उपलोकपाल नियुक्तीसाठी पाठपुरावा करणार
विकासकामांसाठी नेहमीच सकारात्मक भूमिका ठेवणार

पिंपरी, दि. ८ - आज (बुधवार, दि. ८) राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने विभागीय कार्यालयात गटनोंदणी केली. या वेळी गटनेता म्हणून योगेश बहल यांची नोंदणी करण्यात आली. योगेश बहल यांची गटनेतेपदी निवड झाल्याने त्यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड निश्चित झाली आहे.

योगेश बहल हे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या नगरसेवकपदी सलग सहा वेळी निवडून आले आहेत. त्यांचा महापालिकेच्या कारभाराचा अभ्यास दांडगा आहे. या पूर्वीही बहल यांनी महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने विविध पदे भूषवली आहेत. विविध समित्यांचे सभापती, स्थायी समितीचे अध्यक्षपद, सत्तारूढ पक्षनेता, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष तसेच पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे महापौरपद त्यांनी भूषवले आहे. त्यांच्या निवडीमुळे सर्व स्तरातून समाधान व्यक्त केले जात आहे. अतिशय योग्य व्यक्तीची निवड असेच बोलले जात आहे.

गटनेतेपदी निवड झाल्यानंतर बहल यांनी पत्रकारांशी संवाद साधला, त्या वेळी ते बोलत होते. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या माध्यमातून राष्ट्रवादीने शहरात विकासकामे केली. मात्र, जनतेने आम्हाला विरोधात बसण्याचा कौल दिला आहे. जनमताचा कौल आम्हाला मान्य असून, विरोधी पक्षनेता म्हणून सत्ताधाऱ्यांनी चुकीचे निर्णय घेतल्यास ते हाणून पाडले जातील. पारदर्शिकतेच्या कारभारासाठी उपलोकपाल नियुक्त झालाच पाहिजे ही आमची भूमिका असून, शहराच्या विकासासाठी सकारात्मक भूमिका ठेवली जाईल असे मत नवनिर्वाचित राष्ट्रवादीचे गटनेते योगेश बहल यांनी व्यक्त केले.

पुढे बोलताना ते म्हणाले की, आदरणीय शरद पवार व माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी माझ्यावर विश्वास दाखवत गटनेते पदाची जबाबदारी सोपवली आहे. गटनेतेपदी निवड करताना माझे नाव शहराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी आमदार विलास लांडे, माजी आमदार अण्णा बनसोडे, मंगला कदम, नाना काटे, दत्ता साने, अजित गव्हाणे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी पाठिंबा दिल्याने मी सर्वांचा आभारी आहे.

महापालिकेमध्ये आम्ही सत्तारूढ असताना नेहमीच लोकशाही मार्गाने सभागृह चालवले. ठोकशाहीला कधीच थारा दिला नाही. अथवा पारदर्शिकतेच्या नावाखाली कधीही प्रोपोगंडा केला नाही. निवडणुकीपूर्वी विरोधकांनी पक्षाला बदनाम केल्याने जनतेमध्ये गैरसमज निर्माण झाल्याने भाजपसारखा पक्ष सत्तेवर आला. आम्हालाही जनादेश मान्य आहे. विरोधी पक्षात बसण्याचा जो जनतेने कौल दिला आहे तो चोखपणे बजावण्याचे काम आम्ही पार पाडू. विकासकामाच्या नावाखाली सत्ताधारी कोणतेही गैरकाम करणार नाहीत याची काळजी घेतली जाईल. विरोधाला विरोध करणे ही आमची प्रवृत्ती नाही. मात्र चुकीचे काम खपवून घेतले जाणार नाही. लोकशाही पद्धतीने आम्ही यापुढेही जनतेसाठी कटीबद्ध राहणार असल्याची ग्वाही त्यांनी या वेळी दिली. 

महापालिकेमध्ये पारदर्शक कारभार करण्याच्या नावाखाली भाजपने सत्ता मिळवली असून, मुंबईच्या धर्तीवर पिंपरी-चिंचवड महापालिकेमध्ये उपलोकपाल नियुक्त करण्यासाठी राष्ट्रवादी आग्रही भूमिका घेईल. महापालिकेचा कारभार पारदर्शी पद्धतीनेच झाला पाहिजे. यासाठी विरोधी पक्ष म्हणून चोख भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस बजावेल. तसेच शहरातील विकास कामांचा वेग कायम राहील याची दक्षता घेण्यासाठी पक्षाच्या माध्यमातून प्रशासनाला सहकार्य केले जाईल, अशी ग्वाहीही बहल यांनी या वेळी दिली.

महिला दिनाच्या शुभेच्छा - बहल
जागतिक महिला दिनानिमित्त शहरातील सर्व महिला भगिनींना राष्ट्रवादीचे नवनियुक्त गटनेते योगेश बहल यांनी आज शुभेच्छा दिल्या. आदरणीय शरदचंद्र पवार यांनी महिलांना राजकारणाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी महिलांना ५० टक्के आरक्षण दिले. आज महिला सगळीकडे प्रगती करीत असताना शरद पवार यांचा एक छोटासा कार्यकर्ता म्हणून मला अभिमान वाटतो. शहरातील महिलांच्या उन्नतीसाठी महापालिकेच्या माध्यमातून विविध उपक्रम हाती घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा गटनेता म्हणून आपण कटिबद्ध असल्याचे बहल यांनी सांगितले.