ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
बॅनर न्युज
...

महापौर निवडीसाठी भाजपची आज मुंबईत बैठक

पिंपरी, दि. ९ (प्रतिनिधी) - पिंपरी-चिंचवडचे महापौर निवडण्यासाठी आज (गुरुवारी ) बैठक होणार आहे. नितीन काळजे, शत्रुघ्न काटे, नामदेव ढाके, संतोष लोंढे, संदीप वाघेरे, केशव घोळवे यांची नावे आहेत. 

भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे अधिवेशनाच्या निमित्ताने मुंबईत असून, शहरातील पक्षाचे काही पदाधिकारीही मुंबईत दाखल झाले आहेत. सायंकाळपर्यंत महापौरपदाचा उमेदवार जाहीर होण्याची शक्यता आहे.   

दरम्यान, महापौर व उपमहापौरपदासाठी आज दुपारी ३ ते ५ या वेळेत उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. नगरसचिव उल्हास जगताप यांच्या दालनात हे अर्ज दाखल केले जातील. या दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एकाचाच अर्ज दाखल झाला, तर दोघांचीही निवड बिनविरोध निश्‍चित होईल. त्यांच्या निवडीची अधिकृत घोषणा १४ मार्च रोजी आयोजित सभेत केली जाईल. याच सभेत स्थायी समिती व विषय समित्यांचे सदस्य निश्‍चित होतील. स्वीकृत सदस्यांची निवड नियमाप्रमाणे एक महिन्यानंतर म्हणजेच एप्रिल महिन्यात केली जाणार असल्याचे नगरसचिव जगताप यांनी सांगितले.