ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
बॅनर न्युज
...

५० उमेदवारांना बसला 'नोटा'चा फटका

पिंपरी, दि. ९ (प्रतिनिधी) - पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत ५० हजार ३१७ मते ही ‘नोटा’ची (वरीलपैकी एकही पसंत नाही) आहेत. नोटाला मते गेल्याने सुमारे ५० जणांना त्याचा फटका बसला असून थोडक्यात त्यांना पराभव स्विकारावा लागला. 

शहरातील एकूण ११ लाख ९२ हजार ८९ मतदारांपैकी ७ लाख ७९ हजार ६० जणांनी मतदानाचा हक्क बजावला. ही टक्केवारी ६५.३५ टक्के आहे. एकूण ५ लाख ५१ हजार ३६२ पैकी ३ लाख ५८ हजार ५०६ महिला मतदारांनी मतदान केले, तर एकूण ६ लाख ४० हजार ६९६ पैकी ४ लाख २० हजार ५४७ पुरुष मतदारांनी मतदान केले. शहरातील ३१ पैकी केवळ ७ तृतीयपंथी मतदारांनी आपला मताचा हक्क बजावला. एका मतदाराने ४ मते टाकल्याने यंदा मतांची संख्या चौपट झाली आहे. 

महापालिकेच्या सभागृहात एकूण १२८ नगरसेवक आहेत. त्यातील अर्ध्या संख्येने ६४ इतक्या नगरसेविका आहेत. महिलांना सभागृहात बरोबरीची संधी दिली गेली आहे. एकूण ६४ नगरसेविका निवडून आल्या आहेत. त्यातील अनेकजणी नवख्या आहेत. प्रत्येक प्रभागात दोन जागा या महिलांसाठी राखीव होत्या, त्यामुळे अनेक इच्छुकांनी कुटुंबातील महिला सदस्यांना रिंगणात उतरविले. त्यात पत्नी, आई, मुलगी, सून, वहिनी यांचा समावेश आहे. 

एसी, एसटी, ओबीसी आणि खुल्या गटातील महिला जागांवरील उमेदवारांना सर्वाधिक ‘नोटा’ मते दिली गेली आहेत. रिंगणात असलेल्या एकूण ३५४ महिलांना एकूण ५० हजार ३१७ ‘नोटा’ मते दिली गेली आहेत. पुरुष उमेदवारांच्या तुलनेत ही ‘नोटा’ मतांची संख्या दुप्पट आहे. पुरुष उमेदवारांना पडलेल्या ‘नोटा’ मतांच्या तुलनेत महिला उमेदवारांना मतदारांनी कमी पसंती दिली गेल्याचे स्पष्ट होते. नोटाला मते दिली गेल्याने काहींना अगदी थोडक्या फरकाने पराभवाचा सामना करावा लागला. ही मते आपल्याला मिळाली असती तर आपला विजय निश्चित होता, असा दावा आता या उमेदवारांकडून केला जात आहे.