ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
बॅनर न्युज
...

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सत्ताधारी आमदारांचे आंदोलन

मुंबई, दि. ९ - जनतेच्या मागण्यांसाठी आतापर्यंत विरोधी पक्ष आंदोलन करीत असे. परंतु आज (गुरुवार) मुंबई विधानसभेत अजब घटना पाहायला मिळाली. शेतकऱ्यांच्या माफीसाठी भाजप व शिवसेनेच्या आमदारांनी विधानसभेच्या पायऱ्यांवर बसून आंदोलन केले. 

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरुन विधानसभेत गदरोळ झाला. शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे, शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करा, अशा घोषणा शिवसेना आमदारांनी केल्या. आधी शिवसेना आमदारांनी घोषणाबाजीने सभागृह दणाणून सोडलं. शिवसेना आमदरांनी वेलमध्ये उतरण्याचा प्रयत्न केला. मग भजाप आमदारांनीही आक्रमक पवित्रा घेत, त्यांनीही शेतकरी कर्जमाफीसाठीच घोषणाबाजी सुरु केली. या गदारोळामुळे विधानसभेचं कामकाज दुपारी १२ पर्यंत तहकूब करण्यात आलं.

यानंतर मग शिवसेना आमदरांनी विधानसभेच्या पायऱ्यांवर घोषणाबाजीला सुरुवात केली. मग भाजप आमदारांनीही विधानभवनाच्या पायऱ्यांवर  शेतकरी कर्जमाफीसाठी घोषणाबाजी केली.

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा उपस्थित करून खऱ्या शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे. विरोधी पक्षातले नेते नाटक करतात. शेतकऱ्यांना न्याय दिला पाहिजे. १००% कर्ज माफ व्हावी ही भाजपची भूमिका आहे असे भाजप आमदारांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांना विनंती की खऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी, बोगस बँकधारकाना कर्जमाफी देऊ नये अशीही मागणी या वेळी आमदारांनी केली.