ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
बॅनर न्युज
...

परिचारकांना दीड वर्षांसाठी नव्हे कायमचे निलंबित करा - विरोधक

मुंबई, दि. ९ - बेताल वक्तव्य करणाऱ्या आमदार परिचारक यांचे निलंबन दीड वर्षांसाठी केले आहे. परंतु विरोधकांना ते मान्य नाही. परिचारक यांचे कायम स्वरूपासाठी निलंबन व्हावे यासाठी विरोधकांनी विधानभवनात प्रचंड गोंधळ घातला. त्यानंतर विधानभवनाचे काम दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले.

एकीकडे सर्जिकल स्ट्राइकविषयी आक्रमक भूमिका घ्यायची आणि दुसऱ्या बाजूला जवानांविषयी अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्या आमदाराला वाचविण्यासाठी पळवाटा शोधायच्या; असे दुटप्पी राज्यसरकार आता अडचणीत सापडले आहे. विरोधकांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे वादग्रस्त आमदार प्रशांत परिचारक यांचे कायमस्वरूपी निलंबन होते का; हाच मुद्दा आता राजकीय वर्तुळात महत्वाचा ठरला आहे.

परिचारक यांच्या कायमस्वरूपी निलंबनाचा ठराव मुख्यमंत्र्यांनी आणावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी २८९ च्या प्रस्तावाद्वारे केली. शिवसेनेच्या आमदार निलम गोऱ्हे यांनीही विरोधकांच्या मागणीला पाठींबा देऊन शिवसेनेचे इरादे स्पष्ट केले. या मागणीला पाठिंबा देताना एका बाजूला आपण सर्जिकल स्ट्राइकविषयी आक्रमक भूमिका घेणार आणि दुसऱ्या बाजूला जवानांविषयी अपमानास्पद वक्तव्य करणार, असा थेट टोला त्यांनी भाजपला लगावला. तसेच हे प्रकरण वैयक्तिक माफीच्या पलीकडे असून सरकारने स्वतःहून गुन्हा दाखल करावा, अशी मागणी गोऱ्हे यांनी केली. परिचारक यांचे निलंबन व्हावे ही आमच्या पक्षाची भूमिका असल्याचे गोऱ्हे म्हणाल्या.

नीलम गोऱ्हे, नारायण राणे, शरद रणपिसे, भाई जगताप यांच्यासह विरोधी पक्षाच्या सर्वच सदस्यांनी परिचारक यांची परिषदेतून कायमची हकालपट्टीची मागणी केली; तर काँग्रेसचे गटनेता शरद रणपिसे यांनी परिचारक यांना पूर्ण काळासाठी निलंबित करण्यासाठी मुख्यमंत्री, संसदीय नेता आणि सभागृह नेताही ठराव मांडू शकतात असा संदर्भ लोकसभेतील ‘नितीमत्ता’ कमिटीच्या अहवालावरून दिला. तर काँग्रेसचे नेते नारायण राणे यांनी सैनिकांचा अपमान करणाऱ्या सदस्याचे निलंबन करण्यासाठी कायद्याची चर्चा कशाला, त्यांच्या निलंबनासाठी मुहूर्त पाहताय का, असा सवाल करतानाच १९४ (३) या कलमाचा दाखला दिला.