ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
बॅनर न्युज
...

एक्झिट पोलचे निष्कर्ष किती खरे किती खोटे ?

नवी दिल्ली, दि. ९ - पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानानंतर लोकांच्या नजरा आता आज (गुरुवार) टीव्ही वरील विविध चॅनेल्सवर होणाऱ्या एक्झिट पोल्सकडे लागल्या आहेत. उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर येथील निवडणुका आज संपणार आहेत. येत्या ११ मार्चला मतमोजणी होणार आहे. मतमोजणी अगोदर टीव्ही चॅनेल्सवर दाखविणारे एक्झिट पोल हे मतदारांची उत्सुकता वाढवण्याचे काम करतात. परंतु हे एक्झिट पोल किती सत्यात उतरतात हे पाहणे महत्त्वाचे आहे.

एक्झिट पोलचा इतिहास पाहिला तर आतापर्यंतच्या झालेल्या निवडणुकांमध्ये एक्झिट पोलचे निष्कर्ष आणि प्रत्यक्षातील निकाल यात फार फरक नसल्याचे दिसून आले आहे. गेल्या वर्षी चार राज्यात विधानसभेच्या निवडणुका झाल्या होत्या. आसाम, केरळ, पुदुचेरी आणि पश्चिम बंगाल येथे निवडणुका झाल्या होत्या. यांचे एक्झिट पोल आणि प्रत्यक्षात जाहीर झालेले निकाल पुढीलप्रमाणे.

तामिळनाडू - तामिळनाडूमध्ये गेल्या वर्षी झालेल्या निवडणुकीत एक्झिट पोलने अण्णा द्रमुकला फार मोठा पराभव स्वीकारावा लागेल असे वर्तवले होते. प्रत्यक्षात याच्या उलट घडले. जयललिताने सहजरित्या सत्ता काबिज केली. त्यांचे पूर्ण बहुमताचे सरकार स्थापन झाले. २३४ जागा असलेल्या तामिळनाडूत एक्झिट पोलने द्रमुक-काँग्रेस आघाडीला १२० ते १४० जागा मिळण्याची शक्यता व्यक्त केली होती. तर अण्णा द्रमुकला ९० ते ११० जागा मिळतील असे अनुमान काढले होते. प्रत्यक्षात अण्णा द्रमुकने १३६ जागांवर विजय मिळवला.

आसाम - आसाममध्ये १२६ जागा आहेत. एक्झिट पोलने आसाममध्ये भाजप पूर्ण बहुमत मिळवेल असे वर्तविले होते आणि तसेच घडले. आसाममध्ये काँग्रेसचे तरुण गोगई १५ वर्षे मुख्यमंत्री होते. भाजपने सर्वानंद सोनोवाल यांच्या नेतृत्वाखाली ८६ जागा मिळवत पूर्ण बहुमत मिळवले व सत्ता स्थापन केले.

पश्चिम बंगाल - येथील निवडणुकांमध्ये तृणमुल काँग्रेस मोठ्या संख्येने विजयी होईल असे एक्झिट पोलने वर्तवले होते. २९६ जागा असलेल्या विधानसभेत ममता बॅनर्जीने २११ जागा पटकावत निर्विवाद सत्ता स्थापन केली.

केरळ - येथील निवडणुकीनंतर सत्तेत असलेला यूडीएफ पक्ष विरोधात बसेल असे अनुमान एक्झिट पोलने वर्तवले होते. हे निष्कर्ष खरे ठरले. १४० जागांपैकी डाव्या पक्षाने ९१ जागा जिंकत सत्ता काबीज केली.

पुदुचेरी - येथील निवडणुकीतही सर्वच एक्झिट पोलने काँग्रेस-द्रमुक पक्ष सत्तेवर येईल असे वर्तवले होते आणि तसेच घडले.

बिहार - येथील निवडणूकीने एक्झिट पोल्सना चांगलाच झटका दिला. २०१५ मध्ये झालेल्या निवडणुकीत बिहारमध्ये महाआघाडीचे सरकार येणार असे वर्तवण्यात आले होते. महाआघाडीला १३० जागा मिळतील व भाजपला १०८ जागा मिळतील असे वर्तवण्यात आले होते. प्रत्यक्षात झाले उलटेच. महाआघाडीला जनतेने १७८ जागी निवडून दिले.

लोकसभा निवडणुकीतही एक्झिट पोलने एनडीएला सर्वात चांगली कामगिरी करेल असे वर्तवण्यात आले होते. तसेच ते घडले ५४३ जागांपैकी एनडीएने ३३४ जागा पटकावल्या आणि सत्ता काबीज केली. एकट्या भाजपने २८२ जागा पटकावल्या तर काँग्रेसला फक्त ४४ जागा मिळाल्या.