ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
बॅनर न्युज
...

निगडी ते दापोडी बीआरटीएस मार्ग दुचाकी वाहनांसाठी खुला होणार

पिंपरी, दि. १६ – निगडी ते दापोडी या रस्त्यावर उभारलेला  बीआरटीएस मार्ग दुचाकी चालकांसाठी खुला करण्याचा निर्णय पिंपरी-चिंचवड महापालिकेने घेतला आहे. लोखंडी रेलिंग उभे करून बीआरटी बससाठी स्वतंत्र मार्ग तयार करण्यात आला आहे. परंतु, गेल्या चार वर्षांपासून या मार्गावर बीआरटी बस सुरू करता न आल्यामुळे तो बंद ठेवण्यात आला आहे. वाहनचालकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन बीआरटी बस सुरू होईपर्यंत हा मार्ग दुचाकीचालकांसाठी खुला करण्याची मागणी आयुक्त दिनेश वाघमारे यांच्याकडे होत होती. त्यानुसार निगडी ते दापोडी या रस्त्यावरील बीआरटी मार्ग येत्या सोमवारपासून (दि. २०) दुचाकी वाहनांसाठी खुला करण्यात येणार आहे, अशी माहिती सहशहर अभियंता राजन पाटील यांनी दिली.

निगडी ते दापोडी या रस्त्यावर नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने बीआरटीएस बससेवा विनाअडथळासुरू करणे प्रशासनासाठी जिकीरीचे बनले आहे. नाशिक पाटा येथील उड्डाणपुलावरून बीआरटीएस थांब्याकडे ये-जा करण्यासाठी सध्या पूल बांधण्याचे काम सुरू आहे. तसेच महापलिका मुख्यालयासमोरील रस्त्याचे रुंदीकरण, पादचारी मार्गाच्या विकसनाचे काम सुरू आहे. या दोन्ही कामांमुळे निगडी ते दापोडी रस्त्यावरील बीआरटीएस मार्ग सुरू होण्यास विलंब होत आहे. बीआरटीएसच्या उर्वरित मार्गाच्या बाजूने लोखंडी रेलिंग उभारून हा मार्ग बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे निगडी ते दापोडी रस्त्यावर सर्व प्रकारच्या वाहनांना वाहतूककोंडीचा सामना करावा लागत आहे.

गेल्या चार वर्षांपासून वाहनचालकांना हा त्रास सहन करावा लागत आहे.  बीआरटीएस बससेवा सुरू झाल्यानंतर या मार्गावर कोणत्या वाहनांना प्रवेश द्यायचा याबाबत फेरविचार करून तसा निर्णय घेण्यात येणार आहे. आयुक्त वाघमारे यांनी निगडी ते दापोडी या रस्त्यावर उभारण्यात आलेला बीआरटीएस मार्ग दुचाकीवाहनांसाठी खुला करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यामुळे हा बीआरटीएस मार्ग येत्या सोमवारपासून (दि. २०) दुचाकी वाहनांसाठी खुला करण्यात येणार आहे, अशी माहिती सहशहरअभियंता राजन पाटील यांनी दिली.