ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
बॅनर न्युज
...

बुलेट ट्रेन, मेट्रोसाठी पैसा आहे तर कर्जमाफीसाठीच का नाही? - विखे

मुंबई, दि. १८ - राज्य सरकारकडे बुलेट ट्रेन व मेट्रो रेलसाठी पैसा आहे. मात्र, शेतकरी कर्जमाफीसाठीच पैसा का नाही, असा सवाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित केला आहे.

राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल सादर झाल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. जनतेची मागणी नसताना बुलेट ट्रेनसाठी सरकार आग्रही आहे. परंतु, कर्जमाफीसाठी रोज शेतकरी आत्महत्या करीत असताना ही मागणी पूर्ण करण्याची सरकारची तयारी नाही, हे राज्याचे दुर्दैव आहे, असा संताप विखे-पाटील यांनी व्यक्त केला.

आर्थिक पाहणी अहवालासंदर्भात विखे पाटील यांनी सांगितले की, ११ मार्चपर्यंत सरकारने एकूण अर्थसंकल्पाच्या ४७ टक्के इतकाच निधी खर्च केला आहे. ५३ टक्के खर्च अजूनही अखर्चीत आहे. मुळातच या सरकारने लोककल्याणाच्या अनेक योजनांना कात्री लावली आहे. जो निधी कबूल केला जातो, तो देखील दिला जात नाही आणि निधी उपलब्ध झाला तर योग्य पद्धतीने खर्चही होत नाही. ही बाब सरकारचे नियोजन फसल्याचे निदर्शक असून, यातून सरकारची आर्थिक व बौद्धिक दिवाळखोरी उघड झाल्याचा आरोप विखे पाटील यांनी केला.