ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
बॅनर न्युज
...

पेट्रोल चोरीच्या रॅकेटमधील मास्टरमाईंडला अटक

ठाणे, दि. १२ - पेट्रोल पंपावर मायक्रो चिप्स लावून पेट्रोल चोरी करणाऱ्या टोळीतील मुख्य आरोपीला ठाणे पोलिसांनी अटक केली. प्रकाश नुलकर (वय ५६, रा. लोअर परेल) असे आरोपीचे नाव असून, ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने हुबळी येथून त्याला अटक केले आहे. प्रकाश हा मिडको पेट्रोल पंप मशीन तयार करणाऱ्या कंपनीत कार्यरत होता. या कंपनीतून काम सोडल्यानंतर तो पेट्रोल पंपावरील पेट्रोल चोरीत सक्रिय झाला. पेट्रोल पंपावर मायक्रो चिप्स बसवण्याच्या कामासाठी तो ५० हजार पासून १ लाख ५० इतकी रक्कम घेत होता.

इलेक्ट्रॉनिक चीपद्वारे पेट्रोल पंपावरील मापकात फेरफार करून ग्राहकांची फसवणूक होत असल्याचं सर्वप्रथम उत्तर प्रदेशात उघडकीस आलं होतं. या घोटाळ्याचं कनेक्शन ठाणे व डोंबिवलीशी असल्याचं चौकशीतून पुढं आलं. त्यामुळं चांगलीच खळबळ उडाली. या घोटाळ्याची माहिती मिळताच ठाणे पोलिसांनी राज्यभरात छापासत्र सुरू केलं. एकट्या ठाणे जिल्ह्यात अवघ्या दीड महिन्यात ९८ पेट्रोल पंप सील करण्यात आले. याच कारवाईदरम्यान ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं विवेक शेट्येला अटक केली. त्यानंच ह्या चिप देशभरातील पेट्रोल पंपावर पुरवल्याचं व प्रशांत नूलकर हा यात सामील असल्याचं चौकशीत समोर आलं होतं. त्यावरून पोलिसांनी नूलकर याला अटक केली.

पेट्रोल व डिझेल मापकातील बदलामुळं ग्राहकाला लिटरमागे जवळपास २० मिली इंधन कमी दिलं जायचं. मात्र, मशीनवर योग्य तोच आकडा दिसत असल्यानं ग्राहकाला संशय यायचा नाही आणि तो फसवला जायचा. अशा पद्धतीनं एका पंपावर दिवसभरात शंभरहून अधिक लिटर इंधनाची चोरी व्हायची.