ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
बॅनर न्युज
...

रिंगरोड प्रश्न पेटला; बाधितांचा महापालिकेवर एल्गार

पिंपरी, दि. १३ - पिंपरी-चिंचवडमध्ये रिंगरोडचा घाट घातला जात आहे. यामुळे हजारो लोक बेघर होणार आहेत. रहिवाशांनी लोकप्रतिनिधींना साकडे घालूनही परिस्थिती बदलत नसल्याने रहिवाशांचा संताप अनावर झाला आहे. रिंगरोडमुळे बाधित होणाऱ्या रहिवाशांचा मोर्चा घर बचाओ संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली गुरुवारी पिंपरी चिंचवड महापालिकेवर काढण्यात आला. या मोर्चात पिंपळेगुरव, थेरगाव, कासारवाडी, बिजलीनगर, वाल्हेकरवाडी, रावेत गुरुद्वारा या परिसरातील सुमारे अडीच हजार नागरीक सहभागी झाले होते. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या मोर्चात महिलांचा लक्षणीय सहभाग होता.

शासनाने काढलेला डीपी रद्द करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. 1995 मध्ये तयार करण्यात आलेल्या विकास आराखड्यात या रिंगरोडची नोंद आहे; परंतु शासनाने जागा ताब्यात घेतली नाही. त्या जागेवर लोकवस्ती वाढत गेली. आज त्या भागात जवळपास दीड ते दोन लाख लोकांची वस्ती आहे. रिंगरोडमुळे हजारो कुटुंबे रस्त्यावर येणार आहेत, त्यामुळे शासनाने रिंगरोडचे काम तात्काळ स्थगित करावे अशी मागणी करण्यात येत आहे.