ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
बॅनर न्युज
...

...तोपर्यंत सभागृहाचं कामकाज चालू देणार नाही - धनंजय मुंडे

मुंबई, दि. १७ - जोपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी होत नाही, तोवर सभागृहाचं कामकाज चालू देणार नाही, असा इशारा विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी फडणवीस सरकारला दिला. शेतकरी कर्जमाफीवरुन विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात विरोधकांनी गदारोळ उडवला.

मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीचे निवेदन वरच्या सभागृहात म्हणजेच विधानपरिषदेत द्यायला हवं होतं. त्यांनी तसं न करणं हा या सदनाचा अपमान. सभागृह नेत्यांनी माफी मागावी, अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केली.

कर्जमाफीनंतर शेतकऱ्यांच्या आत्महत्या होणार नाहीत, याची हमी विरोधकांनी द्यावी, असं काल मुख्यमंत्री म्हणाले होते. त्यावर धनंजय मुंडे म्हणाले, “दुष्काळ पडणार नाही याची जबाबदारी सरकार घेत असेल, तर शेतकऱ्यांच्या आत्महत्याची जबाबदारी विरोधीपक्ष घ्यायला तयार आहे”.

सरकार जर दुष्काळ पडणार नाही याची हमी देत असेल, तर शेतकरी आत्महत्या करणार नाही याची हमी आम्ही देऊ. काल झालेली गारपीट सरकारला का थांबवता आली नाही, असा सवालही धनंजय मुंडेंनी केला. उत्पनावर अधिक ५०% हमी भाव द्या आम्ही शेतकरी आत्महत्या होणार नाहीत याची हमी देतो, असं धनंजय मुंडेंनी नमूद केलं.

मुख्यमंत्री महोदय, अवकाळी पाऊस होणार नाही याची हमी द्या, दुष्काळ पडणार नाही याची हमी द्या, २४ तास शेतीला पाणी देऊ याची हमी द्या. आम्ही शेतकरी आत्महत्या होणार नाहीत याची हमी देतो, असंही धनंजय मुंडे म्हणाले. मुख्यमंत्री सभागृहात का येत नाही, मुख्यमंत्री महोदयांना कशाची हमी हवी आहे, असा प्रश्नांचा भडीमार धनंजय मुंडेंनी केला.