ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
बॅनर न्युज
...

...काढले रे काढले शिवसेनेला वेड्यात काढले ! - विरोधकांचे शिवसेनेला टोमणे

मुंबई, दि. १८ - विधीमंडळाचे प्रवेशद्वार विरोधकांनी फसवले…रे फसवले शिवसेनेला फसवले आणि काढले रे काढले वेड्यात काढले.. अशा घोषणांनी दणाणून सोडले. शिवसेनेने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्यावर विरोधकांच्या बरोबरीने सभागृहात आणि सभागृहाबाहेर आंदोलन केले. विरोधकांच्या गदारोळामुळे सभागृह १२ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले.

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत शिवसेनेच्या मंत्र्यांसह मुख्यमंत्र्यांनी दिल्लीला शिष्टमंडळ नेले. मात्र शेतकऱ्यांना आश्वासनांपलीकडे काहीही मिळाले नाही. शिवसेनेला थोपवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी ही खेळी खेळल्याचा आरोप विरोधकांनी केला. शिवसेनेसह ही राज्याच्या जनतेची चक्क फसवणूक असल्याचे राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनी म्हटले आहे.

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर विरोधकांसह शिवसेनेच्या आमदारांनीही गेले २ आठवडे कामकाज चालू दिले नाही. मात्र आज बजेट सादर होणार असून सेनेचे नेते आणि अर्थराज्य मंत्री दीपक केसरकर यांना विधानपरिषदेत अर्थसंकल्प मांडायचा आहे. शिवसेना शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्यावर अद्यापही कायम असल्याचे सेनेचे गटनेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांची घोषणाबाजी सुरू असताना विधानमंडळ आवारात आले. मात्र विरोधकांचा आवेश आणि घोषणाबाजी पाहून त्यांनी आपला मार्ग बदलला. दरम्यान विधानसभेचे कामकाज सुरू होताच सभागृहात विरोधी पक्षांनी जोरदार घोषणाबाजी केली. विरोधक वेलमध्ये उतरल्यानंतर शिवसेनेचे आमदार सदानंद चव्हाण, अनिल कदम आणि बालाजी किणीकर हेही वेलमध्ये उतरले.

शेतकऱ्यांची कर्जमाफी झाल्याशिवाय सभागृहात बजेट मांडू दिले जाणार नाही अशी गर्जना करणाऱ्या शिवसेनेला आता आपल्या तलवारी म्यान कराव्या लागत असल्याचे चित्र आहे. मात्र विरोधकांसह वेलमध्ये उतरून सेनेच्या काही आमदारांनी अद्याप आंदोलन जिवंत ठेवले आहे.