ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
बॅनर न्युज
...

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरून ट्रेलर दरीत कोसळला

पिंपरी, दि. १३ - पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर भरधाव वेगाने मुंबईच्या दिशेने जाणारा ट्रेलर चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने सुरक्षा रेलिंग तोडून सुमारे शंभर फूट खोल दरीत कोसळला. खंडाळा पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या मागील बाजूला ही घटना आज गुरुवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जिवितहानी झाली नाही.

महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार (एमएच ०४ ईएल ९६३४) क्रमांकाचा ट्रेलर रिकामा कंटेनर घेऊन पुण्याहून मुंबईच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला. घटनास्थळावर ट्रेलरचा चालक नसल्याने अपघात नेमका कसा झाला हे समजू शकले नाही. मात्र, रस्त्याच्या कडेची सुरक्षा रेलिंग मोठ्या प्रमाणात तोडत सदर ट्रेलर दरीत पडला त्यावरील कंटेनर रस्त्याच्या कडेला पडल्याने वाहतूक कोंडी झाली नाही.

घटनेची माहिती समजताच खंडाळा महामार्ग पोलीस, लोणावळा शहर पोलीस आयआरबीचे अधिकारी कर्मचारी यांनी दरीत सर्वत्र शोध घेतला असता चालक मिळून आलेला नाही. तसेच गाडीच्या केबिनला कोठेही रक्त नसल्याने चालकाने ट्रेलर दरीत पडण्यापूर्वी गाडीतून उडी मारून पलायन केले असावे, असा अंदाज आहे. सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास द्रुतगती मार्गाने मुंबईकडे जाणारी वाहतूक वलवण गावापासून राष्ट्रीय महामार्गावर वळवत सदरचा ट्रेलर बाजूला काढण्यात आला.