ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
बॅनर न्युज
...

महाराष्ट्र झाला ओलाचिंब; नद्यांना पूर

पिंपरी, दि. १४ - गेले दोन पावसाने चांगलाच जोर पकडला असून, राज्यातील धरणसाठ्यांत चांगलीच वाढ झाली आहे. अनेक नद्यांना पूर आले आहेत. आज आणि उद्याही जोरदार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. नागरिकांनी नदी आणि नाल्यांच्या परिसरात फिरू नये असे आपत्ती व्यवस्थापनाने कळवले आहे.

गुरूवारी रात्रीपासून जोरदार कोसळणाऱ्या पावसाने नाशिकला अक्षरश: झोडपून काढले आहे. पावसाने नॉन स्टॉप बॅटींग सुरू ठेवल्याने गोदावरी नदीला पूर आला असून दुतोंड्या मारूतीच्या कमरेपर्यंत पाणी आल्याने नाशिकची दाणादाण उडाली आहे. याशिवाय दारणा आणि भाम नद्यांनीही धोक्याची पातळी ओलांडली आहे. पावसाअभावी खरीप व भाजीपाल्याचे पिके संकटात सापडली होती. त्यांना या पावसाने जीवदान मिळाले आहे.

रायगडमधील आंबानदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. तर नागोठणे शहराला पुराचा तडाखा बसला आहे. शुक्रवारी सकाळी आठ वाजेपर्यंतच्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी ९८ मिलीमिटर पावसाची नोंद झाली. पेण, कर्जत, खालापूर, सुधागड, माणगाव, महाड पोलादपूरसह माथेरान परिसराला पावसाने झोडपून काढले. पेण येथे २४० मिमी, कर्जतमध्ये २३६ मिमी, माथेरानमध्ये १९९ मिमी, सुधागड येथे १५५ मिमी, खालापूर येथे १४४ मिमी तर रोहा येथे ९६ मिमी पावसाची नोंद झाली. संततधार पावसामुळे जिल्ह्यातील नद्यांच्या पातळीत मोठी वाढ झाली. आंबा नदीने पहाटे पाचच्या सुमारास धोक्याची पातळी ओलांडली. त्यामुळे नागोठणे शहराला पुराचा तडाखा बसला. दरम्यान येत्या २४ तासांत जिल्ह्यात पावसाचा जोर कायम राहील असा अंदाज प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवला आहे.