ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
बॅनर न्युज
...

काश्मीरमध्ये दहशतवाद्यांची खुले आम क्रिकेट मॅच (व्हिडिओ)

जम्मू, दि. १४ - दक्षिण काश्मीरमध्ये सध्या एक व्हिडिओ क्लिप फिरत आहे. त्यामध्ये दहशतवादी क्रिकेट मॅच खेळत असल्याचे दिसत आहे. या दहशतवाद्यांनी आपल्या एके-४७ चा वापर स्टम्प म्हणून केला आहे. ही क्लिप व्हायरल करण्यामागे भारतीय लष्कराला आपण जुमानत नसल्याचे त्यांना दाखवून द्यायचे आहे.

एका मिनिटाच्या या व्हिडिओमध्ये पाच तरुण क्रिकेट खेळताना दिसत आहेत. या तरुणांनी एके-४७ रायफलचा वापर स्टम्प म्हणून केला आहे. विशेष म्हणजे व्हिडिओत दिसणारे दहशतवादी अगदी रिलॅक्स मूडमध्ये क्रिकेट खेळताना दिसत आहेत. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये एक उर्दू गाणेदेखील ऐकू येते आहे. दहशतवादी खांद्याला बंदूक लावून क्रिकेटचा आनंद घेताना दिसत आहेत. दक्षिण काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा व्हिडिओ शेअर केला जात आहे. हल्ला केल्यानंतर दहशवादी अतिशय निवांत असतात, हे दाखवून देण्यासाठी या व्हिडिओचा वापर करण्यात येत आहे. काल (गुरुवारी) हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला. अमरनाथ हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर दहशतवाद्यांकडून हा व्हिडिओ प्रसिद्ध करण्यात आला आहे हे विशेष.