ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

पाकिस्तानमधील हॅकर्सना भारतीय हॅकर्सचा दणका

नवी दिल्ली, दि. २६ - भारतातील १० विद्यापीठांना पाकिस्तानी हॅकर्सनी लक्ष्य केले असतानाच पाकिस्तानवर भारतीय हॅकर्सनेही पलटवार केला आहे. पाकिस्तान पीपल्स पार्टीची वेबसाईट भारतीय हॅकर्सनी हॅक केली. याशिवाय पाकिस्तानमधील आणखी ५०० वेबसाईट्सला भारतीय हॅकर्सनी हॅक केल्याचा दावा केला आहे.

पाकिस्तानमधील हॅकर्सनी मंगळवारी दिल्ली विद्यापीठ, अलिगड मुस्लीम विद्यापीठ, आयआयटी दिल्ली आणि आयआयटी बीएचयू या प्रमुख शैक्षणिक संस्थांसह किमान १० संस्थांच्या अधिकृत संकेतस्थळांवर पाकिस्तान झिंदाबादअशी घोषणा टाकून वेबसाईट हॅक केल्यानंतर आता पाकिस्तानवर भारतीय हॅकर्सनेही पलटवार केला आहे. भारतातील हॅकर्सच्या एका गटाने पाकिस्तान पीपल्स पार्टीसह सुमारे ५०० वेबसाईट्स हॅक केल्याचा दावा केला आहे. या हॅक केलेल्या वेबसाईटवर कुलभूषण जाधव यांना सुनावलेली फाशीची शिक्षा अयोग्य असल्याचा संदेशही झळकत होता. यातील बहुसंख्य वेबसाईट या पाकिस्तान सरकारच्या अंतर्गत येतात. पाकमधील वेबसाईट हॅक केल्याचा दावा टीम इंडियन ब्लॅक हॅट या ग्रूपने केला आहे.

पाकिस्तान पीपल्स पार्टी या पक्षाची वेबसाईटही हॅक झाली होती. या वेबसाईटवर पाकमधील सरकारी सर्व्हरवर टीम आयबीएच परत आली आहे. काश्मीरमधील हस्तक्षेप थांबवा अशा आशयाचे संदेशझळकत होते. हा प्रकार समोर येताच पीपीपीने त्यांची वेबसाईट तातडीने रिकव्हरही केली आहे.

हिंदी वृत्तवाहिनीला या गटाने सांगितले की, आम्ही एकट्याने नव्हे तर आमच्यासारख्या अनेकांनी एकत्र येऊन हा गट सुरु केला आहे. टीम ब्लॅक हॅट्स, यूनायटेड इंडियन हॅकर्स या गटांचा यात समावेश आहे. आगामी काळात आणखी काही वेबसाईट्स हॅक करु असा इशाराही या गटाने पाकिस्तानला दिला आहे.