ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

अरविंद केजरीवाल कृतीत कमी पडले – अण्णा हजारे

नवी दिल्ली, दि. २६ - ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिल्ली महापालिका निवडणुकीत झालेल्या आम आदमी पक्षाच्या पराभवावर बोलताना पुन्हा एकदा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर टीकेची तोफ डागली आहे. कृती करण्यात अरविंद केजरीवाल कमी पडल्याची टीका अण्णा हजारेंनी केली आहे. अरविंद केजरीवाल यांच्या बोलण्यात आणि करण्यात फरक असल्याचे अण्णा हजारे बोलले आहेत.

अण्णा हजारे यांनी याआधी काही दिवसांपुर्वी सत्तेच्या खुर्चीत बसल्यावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सत्तेची नशा चढून बुद्धी पालटली असल्याची बोचरी टीका करत सुनावले होते. केजरीवालांसारखे सत्तेची नशा मिळवण्यासाठीच जनतेला अण्णा माझे गुरू आहेत, असे सांगत होते, आता हे माझ्या लक्षात आले आहे. केजरीवाल यांच्यावर दिल्लीतील शुंगलू समितीने भ्रष्टाचाराचे आरोप केल्याने केजरीवाल यांचे शुद्ध आचार, विचार संपून जीवन दागी बनले आहे, अशा शब्दांत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर कडक शब्दांत टीका केली होती.