ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

राष्ट्रपतीपदाबाबत शरद पवारांचे सोनियांशी गुफ्तगू

नवी दिल्ली, दि. २७ - देशातील सर्वच राष्ट्रीय पक्षांच्या हालचाली राष्ट्रपती निवडणुकीच्या निमित्ताने गतिमान झाल्या असून सोलापूर येथील सभेत काही दिवसापूर्वीच आपण राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत नसल्याचे स्पष्ट करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी बुधवारी सायंकाळी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींशी यांची भेट घेऊन पुन्हा एकदा धक्कातंत्राचा वापर केला आहे. या भेटीत पवारांनी राष्ट्रपतीपदाबाबत सोनियांशी गुफ्तगू केल्याचे वृत्त आहे. या भेटीबाबत अधिकृत तपशील मिळाला नसला तरी ही भेट राष्ट्रपतिपदासाठी सर्व विरोधी पक्षांकडून एकच उमेदवार उभा करण्याबाबत असल्याचे समजते.

नुकतेच सोलापूर येथे केवळ चौदा खासदारांच्या बळावर राष्ट्रपतीपदाची स्वप्ने पाहत नसल्याचे सांगत पवारांनी निवडणूक लढविणार नसल्याचे स्पष्ट केले होते. पण त्याचवेळी मोदींनी सर्व विरोधकांशी चर्चा करून निवडणूक बिनविरोध करण्याची सहमतीच्या उमेदवाराचीही भलामण केली होती. ते या पार्श्वभूमीवर सोनियांना भेटले. यापूर्वी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे डी. राजा, संयुक्त जनता दलाचे नेते आणि शर्यतीतील एक नाव शरद यादव यांनीही गेल्या काही दिवसांमध्ये सोनियांशी स्वतंत्रपणे चर्चा केलेली आहे.

देशात सध्या राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून भाजपला आपला उमेदवाररायसीना हिल्सवर पाठविण्यासाठी पंधरा ते वीस हजार मतांची आवश्यकता आहे. त्यासाठी अण्णाद्रमुक (सुमारे ५८ हजार मते), बिजू जनता दल (सुमारे ३३ हजार मते), तेलंगणा राष्ट्र समिती (सुमारे २२ हजार), वायएसआर काँग्रेस (१७ हजार) आदी पक्षांवर भाजपचा डोळा आहे. यापैकी एखादा जरी पक्ष भाजपच्या गळाला लागला तरी निवडणूक सहजपणे जिंकता येईल, असे सध्याचे चित्र आहे.

राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडे प्राथमिक आकडेवारीनुसार सुमारे ४९ टक्के मते, विरोधकांकडे (संयुक्त पुरोगामी आघाडी) ३६ टक्के आणि कुंपणावरील सहा पक्षांकडे सुमारे १४ टक्के मते आहेत. एखादा तगडा उमेदवार सर्व विरोधकांमार्फत दिल्यास आणि कुंपणावरील पक्षांना स्वत:च्या बाजूने वळविल्यास मोदींच्या उमेदवाराची चांगलीच दमछाक होऊ शकते, Posted On: 27 April 2017