ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

लोकपाल विधेयक त्वरीत लागू करा - सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली, दि. २७ - केंद्र सरकारला लोकपाल विधेयक लागू करण्याचे सर्वोच्च न्यायालयाने गुरूवारी निर्देश दिले आहेत. न्यायालयाने केंद्र सरकारला लोकपाल विधेयक व्यावहारिक असून ते विधेयक लटकवत ठेवणे न्यायोचित नाही, असे म्हणत फटकारले.

एका स्वंयसेवी संस्थेने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायमुर्ती रंजन गोगोई आणि नवीन सिन्हा यांच्या पीठाने असे म्हटले. सरकारने हे विधेयक विरोधी पक्ष नेता नसल्यामुळे लागू करता येत नसल्याचे म्हटले होते. केंद्र सरकारचा हा मुद्दा खोडत लोकपाल विधेयक त्वरीत लागू करण्यास न्यायालयाने सांगितले. विना विरोधी पक्षनेत्याशिवाय ते लोकपाल विधेयक संमत होण्यासाठी संशोधन केले जात असल्याचे केंद्राने म्हटले होते.