ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

माझ्याकडे असलेल्या पैशांचा संबंध नाही – प्रियंका वडेरा

नवी दिल्ली, दि. २८ - रॉबर्ट वडेरा किंवा त्यांच्या कंपनीशी कोणताही संबंध माझ्याकडे असलेल्या पैशांचा नसल्याचे प्रियंका गांधी यांनी स्पष्ट केले असून काही वर्षांपूर्वी हरियाणामध्ये प्रियंका गांधी यांनी जमीन विकत घेतली होती. पण या जमीन खरेदी व्यवहारावर एका वृत्तपत्राने प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. डीएलएफ कंपनीने दिलेल्या पैशांतून हा खरेदी व्यवहार झाल्याची शक्यता वृत्तपत्राने व्यक्त केली होती.

प्रियंका गांधी यांनी या पार्श्वभूमीवर आपल्याकडे असलेल्या पैशांचा रॉबर्ट वडेरा किंवा त्यांच्या स्कायलाईट हॉस्पिटॅलिटी कंपनीशी कोणताही संबंध नसल्याचे म्हटले आहे. वडेरा यांची स्कायलाईट हॉस्पिटॅलिटी ही कंपनीची सध्या डीएलफशी केलेल्या वादग्रस्त व्यवहारांप्रकरणी हरियाणा सरकारच्या रडारवर असल्यामुळे प्रियंका गांधींची ही जमीन खरेदी चर्चेचा विषय ठरली होती.

प्रियंका गांधी यांच्या कार्यालयाकडून या पार्श्वभूमीवर या खरेदी व्यवहाराबाबत सविस्तर स्पष्टीकरण प्रसिद्ध करण्यात आले आहे. या प्रसिद्धी पत्रकात म्हटल्याप्रमाणे फरिदाबादच्या अमिपूर गावात प्रियंका गांधी यांनी पाच एकर जमीन खरेदी केली होती. स्कायलाईट हॉस्पिटॅलिटी कंपनी वादात सापडण्याच्या सहा वर्षांपूर्वीच ही खरेदी करण्यात आली होती. त्यानंतर २०१० मध्ये प्रियंका गांधी यांनी ही जमीन मूळ मालकाला पुन्हा विकली होती. हा संपूर्ण व्यवहार धनादेशाद्वारे (चेक) झाला होता.

ही जमीन खरेदी करण्यासाठी आपण पैसा कुठून आणला, याचेही स्पष्टीकरण प्रियंका यांनी दिले आहे. मला वारसा हक्काने माझी आजी इंदिरा गांधी यांच्याकडून मालमत्ता मिळाली होती. आपण फरिदाबादमधील जमीन याच मालमत्तेवर मिळणाऱ्या भाड्यातून खरेदी केल्याचे प्रियंका यांनी सांगितले. त्यामुळे प्रियंका गांधी यांच्या आर्थिक मिळकतीचा किंवा मालमत्तेचा रॉबर्ट वडेरा, स्कायलाईट हॉस्पिटॅलिटी किंवा डीएलएफ कंपनीशी कोणताही संबंध नसल्याचे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. केवळ माझी प्रतिमा मलीन करण्यासाठी अशाप्रकारचे चुकीचे, निराधार आणि बदनामीकारक आरोप करण्यात येत असल्याचेही प्रियंका यांनी म्हटले आहे.