ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

शहीद जवानांच्या मुलांच्या शिक्षणाचा सर्व खर्च करणार - गौतम गंभीर

नवी दिल्ली, दि. २८ - छत्तीसगडमधील सुकमामध्ये झालेल्या नक्षलवादी हल्ल्यात सीआरपीएफच्या ७४ डेल्टा बटालियनचे २५ जवान शहीद झाले होते. या जवानांच्या कुटुंबियांच्या मदतीसाठी क्रिकेटपटू गौतम गंभीर सरसावला आहे. जवानांच्या मुलांच्या शिक्षणाचा सर्व खर्च करणार असल्याचे गौतम गंभीर याने जाहीर केले आहे.
न्यूज एजन्सीनुसार, गंभीरने सांगितले की, सुकमामध्ये नक्षली हल्ल्यात २५ जवान शहीद झाल्याच्या घटनेनंतर खूप अस्वस्थ झाला होतो. बुधवारी रात्री झालेल्या सामन्यावरही लक्ष केंद्रीत करता आले नाही. रायझिंग पुणे सुपरजाईंट्सविरुद्ध झालेल्या सामन्यादरम्यान गंभीर आणि संघातील क्रिकेटपटूंनी मनगटावर काळी फित बांधून शहीद जवानांना श्रद्धांजली