ब्रेकिंग न्यूज
उल्हासनगर : रेल्वे स्टेशनबाहेर वडापावच्या दुकान मालकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, चंदरलाल रामरखियानी 100 % भाजले      पाकिस्तानात बेपत्ता झालेले दोन्ही मौलवी भारतात परतले      बेळगावात ड्राय डेच्या दिवशी दारु न दिल्याने पोलिसांची हॉटेल मॅनेजरला लाथा-बुक्क्यांनी मारहाण      नागपूरमध्ये राजू शेट्टी यांचे स्टेट बँक इंडियाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन      पतीची हत्या करुन मृतदेह बीएमडब्ल्यू गाडीत लपवला, पत्नीविरोधात गुन्हा दाखल, पंजाबमधील घटना      उत्तरप्रदेशमध्ये बहुजन समाज पक्षाचे नेते मोहम्मद समी यांची भररस्त्यात हत्या      छत्तीसगडमधील दंतेवाडामधूल पाच नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा हस्तगत      महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना फसवणारा, जनतेला गाजर दाखवणारा अर्थसंकल्पः जयंत पाटील      जळगाव : शहरापासून जवळच असलेल्या भादली गावात मध्यरात्री एका कुटुंबातील चौघांची चोरटयांनी हत्या केली.      मुंबईने गमावला मतदानाचा अधिकार, ईशान्य भारतातील राज्यांना मिळाला BCCI मध्ये मतदानाचा हक्क
...

मोदींचे दूत सज्जन जिंदाल- नवाझ शरीफांची गुप्त भेट

इस्लामाबाद, दि. २८ (वृत्तसंस्था) - पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांची भारतातील प्रसिद्ध उद्योगपती आणि जेएसडब्ल्यू स्टीलचे प्रमुख सज्जन जिंदाल यांनी भेट घेतल्याने सर्वांच्याच भूवया उंचावल्या असून पाकिस्तानच्या व्हिसा नियमांचे सज्जन जिंदाल यांनी उल्लंघन केले असून ते मोदींचे दूत म्हणून पाकिस्तानमध्ये आले होते असा आरोप पाकिस्तानमधील प्रसारमाध्यमांमधून केला जात आहे.

याबाबत पाकमधील प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार बुधवारी नवाझ शरीफ यांची सज्जन जिंदाल यांनी भेट घेतली. मोदींचे दूत म्हणून जिंदाल हे पाकमध्ये आले होते. भारताने पाकिस्तानसोबत मागच्या दाराने चर्चा करण्याचा हा प्रयत्न होता असा आरोप प्रसारमाध्यमांमधून केला जात आहे. मोदी- शरीफ यांची जूनमध्ये कझाकस्तानमध्ये भेट व्हावी यासाठी जिंदाल हे शरीफ यांच्या भेटीसाठी आले होते अशी चर्चा पाकमधील प्रसारमाध्यमांमध्ये रंगली आहे. जिंदाल- शरीफ भेट गोपनीय ठेवण्यात आली होती. पण याची माहिती प्रसारमाध्यमांना मिळाली आणि शरीफ यांच्यावर टीका सुरु झाली. या भेटीवर शरीफ यांची कन्या मरियम शरीफ यांनी ट्विटरवर खुलासा केला. सज्जन जिंदाल हे माझ्या वडीलांचे जुने मित्र आहेत. या भेटीत गोपनीय काहीच नव्हते असे त्यांनी सांगितले.