ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

छोटा शकिलचा खुलासा; दाऊद धडधाकट

कराची, दि. २९ (वृत्तसंस्था) - कुख्यात माफिया तस्कर दाऊद इब्राहिमचा हस्तक छोटा शकिलने दाऊदच्या मृत्यूच्या बातम्या अफवा असल्याची माहिती दिली असून याबाबत टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना छोटा शकिलने सांगितले आहे की, दाऊदच्या बातम्या चुकीच्या आहेत. असे काही झाले असेल असे माझ्या आवाजावरुन तुम्हाला वाटते का? या सगळ्या अफवा असून भाईची तब्येत एकदम ठणठणीत आहे.

दाऊद इब्राहिम याची प्रकृती अत्यंत नाजूक असून तो येथील रुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती याआधी मिळाली होती. त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले असून त्याच्या प्रकृतीबद्दल एक ना अनेक गोष्टी बोलल्या जात होत्या. एका बातमीनुसार दाऊदला हृदयविकाराचा झटका आला तर दुसऱ्या बातमीनुसार त्याला ब्रेन ट्युमर झाला आहे.

२२ एप्रिल रोजी पाकिस्तानातील प्रसिद्ध डॉक्टरांनी त्याच्यावर कराचीत शस्त्रक्रिया केली होती परंतू ती वाया गेली. त्याला कृत्रिम श्वासोच्छ्वासावर ठेवण्यात आले. त्याच्या गंभीर प्रकृतीची माहिती त्याच्या मुंबईतील कुटुंबियांना दिली गेली आहे. मात्र याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. डी कंपनीशी संबंधित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दाऊदला २० दिवसांपूर्वी अर्धांगवायुचा झटका आला त्यात त्याच्या शरीराचा उजवा भाग बधीर झाला.