ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

शहिदांच्या कुटुंबांना दत्तक घेणार आयएएस अधिकारी

नवी दिल्ली, दि. २९ - आयएएस अधिका-यांनी नक्षलवादी तसेच दहशतवाद्यांशी लढताना शहीद झालेल्यांसाठी फक्त अश्रू ढाळत शोक व्यक्त करण्यापेक्षा त्यांच्या कुटुंबांना मदत करण्याचा निर्धार केला असून शहिदांच्या कुटुंबांना आयएएस अधिका-यांनी पुढाकार घेत दत्तक घेण्याचा निर्णय घेतला आहे. आयएएस अधिका-यांनी हे स्तुत्य पाऊल देशासाठी जीवाची बाजी लावून लढत असताना शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबावर त्यांच्यानंतर हालाखीत राहण्याची वेळ येऊ नये यासाठी उचलले आहे. हे अधिकारी त्यांच्या मुलांना सर्वोत्तम शिक्षण आणि कुटुंबाला लागणारी आर्थिक मदत याची काळजी घेतील.

देशाची सुरक्षा करत असताना शहिद झालेल्या संरक्षण, केंद्रीय सशस्त्र पोलिस आणि राज्य पोलीस दलातील शहिद जवानांच्या कुटुंबांना दत्तक घेण्याचा निर्णय आयएएस अधिका-यांच्या संघटनेने घेतला आहे. एका कुटुंबाला पाच ते दहा वर्षांसाठी प्रत्येक अधिकारी दत्तक घेऊन त्यांचा सांभाळ करेल. ज्या कुटुंबाला दत्तक घेण्यात येईल ती शक्यतो आयएएस अधिका-याची नियुक्ती असणा-या राज्यातील असेल, अशी माहिती इंडियन सिव्हिल अॅण्ड अॅडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस (सेंट्रल) असोसिएशनचे सचिव संजय भुसरेड्डी यांनी दिली आहे.

अधिका-याला या कुटुंबाला थेट आर्थिक मदत करण्याची गरज नाही. मात्र गरजेतपुरता त्यांना हात द्यावा जेणेकरुन दैनंदिन जीवनात त्यांना कोणत्या समस्या होणार नाहीत. तसेच त्यांच्यात सुरक्षा आणि गरजेच्या वेळी देश आपली काळजी घेत असल्याची भावना निर्माण व्हावी, असे सचिव संजय भुसरेड्डी यांनी म्हटले आहे.

ज्या भागात २०१२ ते २०१५मधील बॅचच्या ६०० ते ७०० अधिका-यांना त्यांची नियुक्ती असेल तेथील किमान एका कुटुंबाला दत्तक घेण्यास सांगण्यात येणार आहे. अधिकारी यासाठी स्वत: पुढाकार घेऊन कुटुंबाला भरपाई, पेन्शन, ग्रॅच्युइटी किंवा सरकारकडून जाहीर करण्यात आलेला पेट्रोल पंप, जमीन, नोकरी या सेवा व्यवस्थित मिळत आहेत की नाही याची काळजी घेतील. त्याचप्रमाणे सरकारच्या स्किल इंडिया किंवा डिजिटल इंडिया अंतर्गत मुलांना योग्य शिक्षण किंवा कौशल्य शिक्षण मिळत आहे की नाही याचीदेखील जबाबदारी घेतील. जर कुटुंबाला एखादा व्यवसाय सुरु करण्याची इच्छा असेल तर