ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

जनकल्याण व देशहितामध्ये मोदी सरकार अपयशी - मायावती

लखनौ, दि. ५ - भाजप पंतप्रधान मोदींवर पुन्हा एकदा बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी निशाणा साधत म्हटले आहे की, जनहित, जनकल्याण देशहितामध्ये अपयशी ठरताना जेव्हा भाजप मोदी सरकार दिसते. तेव्हा सामान्य जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी मोदी भाजपचे आघाडीचे नेते देवदर्शन आणि मंदिराच्या चकरा मारण्यास सुरूवात करतात. अशी जहरी टीका मायवतींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केली आहे.

मायावती म्हणाल्या की, भाजपकडून लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी देवाचा आधार घेतला जातो. त्यांनी हरियाणा, पंजाब चंदीगडमधील राजकीय स्थितीची माहिती घेण्यासाठी आयोजित बैठकीनंतर बोलताना केंद्र भाजप शासित राज्यांकडून भगव्याचे तुष्टीकरण केले जात आहे. गुन्हेगारांना संरक्षण दिले जात असल्यामुळे देशातील वातावरण बदलले असल्याचा आरोप केला.

मायावती म्हणाल्या की, भाजपकडून सुरूवातीपासूनच निवडणुकीच्या फायद्यासाठी धर्माचा वापर केला जात आहे. भाजप अकाली दलाच्या सरकारमधून पंजाबची सुटका झाली आहे. पण हरियाणामध्ये भाजपच्या कट्टरवादामुळे राज्य पुन्हा मागे जाताना दिसत असल्याचा आरोप त्यांनी केला. संवैधानिक पदांवर बसलेल्या लोकांकडून चुकीची हिंसक भाषा वापरली जात असल्यामुळे हरियाणातील भाजप सरकार कायम चर्चेत असते. तिथे दलितांबरोबरही राज्य सरकारची वागणूक योग्य नाही. हरियाणात दलितांचे शोषण अन्याय सातत्याने सुरूच आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.