ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

उत्तर प्रदेशातील विद्यापीठांमध्ये आता मराठीचे धडे

नवी दिल्ली, दि. ५ - महाराष्ट्र दिनापासून प्रेरणा घेऊन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेश दिन साजरा करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता राज्यातील विद्यापीठांमध्ये मराठी भाषा शिकविण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत महाराष्ट्राबरोबरील सांस्कृतिक संबंध दृढ करण्यासाठी सहकार्य करारही करण्याची घोषणाही केली. परप्रांतीयांबाबतच्या वादांच्या पार्श्वभूमीवर योगींच्या या निर्णयाने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

लखनौतील राजभवनामध्ये उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांच्या पुढाकाराने महाराष्ट्र दिनाचा सोहळा नुकताच रंगला. योगी, त्यांचे उपमुख्यमंत्री डॉ. दिनेश शर्मा त्यासाठी आवर्जून निमंत्रित केलेले सांगलीचे भाजप खासदार संजयकाका पाटील आदी उपस्थित होते. योगींनी त्यावेळी केलेल्या भाषणामध्ये राज्यातील विद्यापीठांमध्ये मराठी भाषा शिकविण्याची घोषणा केली. उत्तर प्रदेशातील विद्यापीठांचे राज्यपाल या नात्याने नाईक हे कुलपती आहेत.

नाईक यांनी महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशामध्ये दीर्घकालीन सांस्कृतिक संबंधांचा उलगडा करताना रामायण, छत्रपती शिवाजी महाराज आणि लोकमान्य टिळक आदींसंदर्भातील अनेक धार्मिक, सांस्कृतिक, राजकीय घटनांचा हवाला दिला होता. योगी तोच धागा पकडून आणि आपल्या भाषणाची सुरुवातजय महाराष्ट्रने करून म्हणाले, महाराष्ट्राचे आर्थिक, धार्मिक, राजकीय क्षेत्रांमध्ये योगदान मोठे आहे. आम्हाला शिवरायांनीच भेदभाव करता ताठ मानेने जगायला शिकविले. राष्ट्रीयत्व त्यांनीच दिले. अशा महाराष्ट्राबरोबरचे सांस्कृतिक संबंध दृढ करण्याचा माझा प्रयत्न असेल.