ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

निर्भया बलात्कार प्रकरणी चारही दोषींची फाशी कायम

नवी दिल्ली, दि. ५ - दिल्लीतील निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणी चारही दोषींची फाशीची शिक्षा कायम ठेवण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने राजधानी दिल्लीत २०१२ मध्ये झालेल्या निर्भया बलात्कार प्रकरणावर आज अंतिम निकाल दिला. आरोपी पवन, मुकेश, विनय आणि अक्षय या चार दोषींना दिल्ली सत्र न्यायालय आणि दिल्ली उच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली होती. त्याविरोधात त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्यावर आज सर्वोच्च न्यायालयानेही शिक्कामोर्तब केलं.

सर्वोच्च न्यायालयात आज दुपारी दोन वाजता सुनावणीला सुरुवात झाली. तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने २० मिनिटांत निकाल देत चारही दोषींची फाशीची शिक्षा कायम ठेवली. निर्भयाच्या कुटुंबाने दोषींना फाशीची शिक्षा कायम ठेवण्याची मागणी केली होती. “आमचा न्यायव्यवस्थेकडून फार अपेक्षा आहेत. दोषींना फाशीच होईल. जर संविधानात शिक्षेची तरतूद आहे, तर निर्भया प्रकरणापेक्षा वाईट प्रकरण असूच शकत नाही. त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही, असं निर्भयाची आई म्हणाली होती.

१६ डिसेंबर २०१२ रोजी दिल्लीत झालेल्या या अमानुष बलात्काराने अवघा देश हादरला होता. या घटनेच्या निषेधार्थ देशभरात आंदोलनं झाली होती. दिल्लीत मोठं जनआंदोलनही करण्यात आलं होतं. या प्रकरणात एकूण आरोपी होती. त्यापैकी एक आरोपी राम सिंहने आत्महत्या केली होती. तर आरोपी अल्पवयीन होता. बालसुधारगृहात वर्षाच्या शिक्षेनंतर त्याची सुटका झाली आहे.