ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

साडी नेसून आलेल्या विदयार्थिनींना देता येणार नाही नीट परीक्षा

नवी दिल्ली, दि. ६ - ७ मे रोजी देशभरातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये एमबीबीएस आणि दंतवैद्यक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सीबीएसईचीनीटही प्रवेशपूर्व परीक्षा होणार असून सीबीएसईने यासाठी ड्रेसकोडसह अनेक दिशानिर्देश जारी केले असून त्यांचे पालन केल्यास परीक्षेपासून वंचित राहावे लागू शकते. कॉपीच्या प्रकारांना आळा घालण्यासाठीही सीबीएसईने अनेक नियम बनवले आहेत. यात विद्यार्थ्यांनी काय घालावे, सोबत काय आणावे आणि काय नाही, याविषयी सल्ला दिला आहे.

या परीक्षेचे देशभरातील १०३ केंद्रांवर आयोजन करण्यात आले असून यंदा इंग्रजीसह अन्य नऊ प्रादेशिक भाषांमध्येही ही परीक्षा देता येणार आहे. यामध्ये हिंदी, इंग्रजी, आसामी, बांगला, गुजराती, मराठी, कन्नड, ओडिया, तमिळ आणि तेलुगूचाही समावेश आहे.

सीबीएसईने नीट परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी परिधान करावयाच्या कपड्यांबाबत कठोर नियम बनवले आहेत. विद्यार्थिनी परीक्षेत साडी घालून तसेच मेंदी लावून येऊ शकणार नाहीत. विद्यार्थ्यांना हवाई चप्पल किंवा सँडल, हाफ बाह्यांचे टी-शर्ट किंवा शर्ट, ट्राऊझर, लेगिंग्स, लोवर, प्लाझो, हाफ बाह्याची कुर्ती, टॉप घालता येईल. मोठ्या बटणाचे किंवा फुलांचे चित्र असलेल्या कपड्यांवर बंदी आहे.

विवाहित महिलांना या परीक्षेसाठी मंगळसूत्र घालण्याची परवानगी आहे. मात्र, बुरखा किंवा साडी परिधान करता येणार नाही. ताईत, ब्रेसलेट, कृपाणसारख्या वस्तू जवळ बाळगता येणार नाहीत. शिवाय पर्स, क्रेडिट-डेबिट कार्ड, लॉकेट, बूट, पूर्ण बाह्यांचे शर्ट, घड्याळ, उन्हापासून बचाव करणारे चष्मे, हेअरक्लिप, रबरबँड, बेल्ट, बांगड्यासुद्धा घालता येणार नाही.

सीबीएसईने नीटसाठी खास पेन तयार केला असून परीक्षा केंद्रावर प्रवेशपत्र दाखवल्यानंतर हा पेन विद्यार्थ्याला दिला जाईल. हा पेन फक्त नीट परीक्षेसाठीच तयार करण्यात आला असल्याने बाजारात कुठेही मिळणार नाही.