ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

भारताने क्षेपणास्त्र डागून उद्ध्वस्त केल्या पाकच्या चौक्या

नवी दिल्ली, दि. ८ - काही दिवसांपूर्वी पाकिस्तानी सैन्याकडून करण्यात आलेल्या घृणास्पद कृत्याचा बदला भारतीय लष्कराने सोमवारी घेतला आहे. सोमवारी सकाळी पाकिस्तानकडून जम्मू-काश्मीरच्या नौशेरा सेक्टरमध्ये पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. भारतीय सैन्याकडून यावेळी पाकला सडेतोड प्रत्युत्तर देण्यात आले.

याबाबत वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार पाकच्या सीमारेषेवरील चौक्या भारतीय लष्कराने केलेल्या कारवाईत पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्या आहेत. भारताने या चौक्यांना लक्ष्य करण्यासाठी अँटी टँक गायडेड मिसाईल्सचा वापर केल्याचे सांगण्यात येत आहे. या कारवाईचा एक व्हिडिओही भारतीय सैन्याकडून प्रसिद्ध करण्यात आला आहे. या व्हिडिओत भारतीय लष्कराने पाकिस्तानी चौक्यांवर तब्बल सात क्षेपणास्त्रे डागल्याचे दिसत आहे. या हल्ल्यात पाकिस्तानी बंकर्स पूर्णपणे उद्धस्त झाल्याचेही दिसत आहे.