ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

लातूरकरांची मागणी अमान्य, मात्र नव्या ट्रेनची घोषणा

नवी दिल्ली, दि. ८ - लातूर एक्स्प्रेसचा वाद थेट दिल्लीपर्यंत पोहोचला आहे. मराठवाड्यातील नेत्यांनी थेट दिल्लीत रेल्वे मंत्रालयातच डेरा टाकला.विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यापाठोपाठ कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची भेट घेतली. त्याआधी लातूरचे खासदार सुनील गायकवाड यांनीही रेल्वेमंत्र्यांची भेट घेतली होती.

सध्याची लातूर-मुंबई एक्स्प्रेस ही लातूरपर्यंतच ठेवण्याची जी मूळ मागणी होती ती मान्य झालेली नाही. मात्र जुलैपासून बिदरमुंबई एक्सप्रेस या नव्या रेल्वेला मंजुरी देण्यात आली आहे. ही रेल्वे दररोज धावणार आहे. लातूरची ट्रेन बिदरला पळवली असा जो प्रचार होतोय, त्याला उत्तर म्हणून यशवंतपूरहून बिदरला येणारी ट्रेन जिचा स्टॉप बिदरलाच असायचा ती आता लातूरपर्यंत वाढवली जाणार आहे. तीन आठवड्यात ही रेल्वे सुरू होईल.

या वादानंतर आता बिदर-मुंबई अशी नवी रेल्वे जुलैपासून सुरु होणार आहे. ही रेल्वे दररोज धावणार असून, लातूर,उस्मानाबाद, बिदर या तीनही भागांना समान कोटा राहणार आहे. शिवाय यशवंतपूर ते बिदर जाणारी रेल्वे लातूरपर्यंत वाढवण्यात येणार आहे.इतकंच नाही तर लातूर- गुलबर्गा ही रेल्वे तीन आठवड्यांत सुरु होणार  आहे.

मुंबई-लातूर रेल्वे बिदर ऐवजी परळी पर्यंत करावी, मुंबईसाठी परळीतून आणखी स्वतंत्र रेल्वे सुरु करावी, परळीबीडनगर रेल्वे मार्गाचे काम नगरप्रमाणे परळीच्या बाजूनेही सुरु करावे अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केली.

मुंबई- लातूर रेल्वे ही लातूरपर्यंतच हवी, त्यानंतर हवं तर शटल सेवा पुण्यापर्यंत करा, अशी मागणी संभाजी पाटील निलंगेकर यांनी केली. दक्षिणेतल्या यशवंतपूरपासून बिदरपर्यंतची ट्रेन उलट लातूरपर्यंत वाढवा, असंही त्यांनी नमूद केलं.

काय आहे लातूर एक्स्प्रेसचा वाद

लातूर येथून सुटणारी लातूर-मुंबई एक्स्प्रेस बिदरहून सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र या गाडीत लातूरकरांनाच जागा मिळत नाही, तर बिदरहून सोडल्यानंतर आणखी प्रवाशांची भर पडेल, त्यामुळे लातूरकरांची आणि पुढच्या प्रवाशांची गैरसोय होईल, असं लातूरकरांचं म्हणणं आहे.गाडी बिदरहून सोडण्याचा निर्णय मागे घेण्यासाठी लातूरकर आक्रमक झाले आहेत.