ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

अॅमेझॉनने भारताच्या नकाशातून वगळला जम्मू-काश्मीरचा भाग

नवी दिल्ली, दि. ९ - पुन्हा एकदा भारतीय राष्ट्रध्वजाचा अॅमेझॉन या -कॉमर्स संकेतस्थळाकडून अपमान करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. याशिवाय, अॅमेझॉनच्या संकेतस्थळावर विक्रीसाठी असलेल्या भारताच्या नकाशातून जम्मू-काश्मीरचा भाग वगळल्याचेही निदर्शनास आल्यामुळे पुन्हा एकदा अॅमेझॉन वादात सापडण्याची शक्यता आहे.

सोशल मीडियाच्या माध्यमातून या सगळ्या प्रकाराविरुद्ध दिल्ली भाजपचे प्रवक्ते ताजिंदर पाल सिंग बग्गा यांनी आवाज उठवला असून ही उत्पादने अॅमेझॉनने तातडीने संकेतस्थळावरून काढून टाकावीत, असेही बग्गा यांनी म्हटले आहे. काही दिवसांपूर्वी भारतीय राष्ट्रध्वजाच्या रंगाच्या पायपुसण्यांची विक्री अॅमेझॉन कॅनडाच्या वेबसाईटवर होत असल्याने तेथील भारतीयांनी त्याला विरोध केला होता. तसेच अॅमेझॉनविरोधात याचिकाही दाखल केली होती. त्यामुळे भारतात अॅमेझॉनविरुद्ध वातावरण चांगलेच तापले होते.

या उत्पादनांची विक्री अॅमेझॉनने तात्काळ बंद करावी आणि बिनशर्त माफी मागावी. अन्यथा अॅमेझॉनच्या एकाही अधिकाऱ्याला भारतीय व्हिसा दिला जाणार नाही. तसेच याअगोदर देण्यात आलेले व्हिसाही रद्द करण्यात येतील, अशी तंबीच सुषमा स्वराज यांनी अॅमेझॉनला दिली होती.