ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

अपहरण करून लेफ्टनंटची दहशवाद्यांकडून हत्या

श्रीनगर, दि. १० - दहशतवाद्यांनी विवाहसोहळ्यातून अपहरण केलेल्या भारताच्या २२ वर्षीय लेफ्टनंटची गोळ्या घालून हत्या केली आहे. उमर फयाझ असं या शहीद अधिकाऱ्याचं नाव आहे. धक्कादायक म्हणजे उमर फयाझ हे महिन्यापूर्वीच आर्मीत भरती झाले होते. लष्कराच्या राजस्थान रायफल्स तुकडीत ते सेवा बजावत होते.

उमर फयाझ यांचा मृतदेह शोपीयन परिसरात आढळला. धक्कादायक म्हणजे त्यांच्या डोक्यात आणि पोटात गोळ्या आढळल्या आहेत. उमर फयाझ हे मूळचे काश्मीरचेच होते. त्यांनी चुलत भावाच्या लग्नासाठी सुट्टी घेतली होती. दक्षिण काश्मीरमधील कुलगाव इथं हा विवाहसोहळा होता. मात्र रात्री दहाच्या सुमारास दहशतवाद्यांनी त्यांचं अपहरण केलं. या अपहरणानंतर त्यांचं कुटुंब दहशतीखाली होतं. भीतीमुळे त्यांनी याबाबतची तक्रारही केली नाही. उमर फयाझ हे परत येतील अशी आशा त्यांना होती. मात्र आज त्यांचा मृतदेहच आढळल्याने खळबळ उडाली आहे.

उमर फयाझ हे राष्ट्रीय सुरक्षा प्रबोधिनी अर्थात एनडीए पासआऊट होते. बहुआयामी उमर फयाझ हे एनडीएच्या हॉकी टीममध्ये होतेच, शिवाय ते व्हॉलीबॉलही उत्तम खेळायचे. डिसेंबरमध्येच ते आर्मीत रुजू झाले होते. त्यांना काश्मीर परिसरातील धोक्याची जाण होती. मात्र कोणत्याही शस्त्राशिवाय त्यांनी गावी जायला नको होतं, असं लष्करी अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. उमर फयाझ हे सुट्टीवर असूनही दहशतवाद्यांनी त्यांना टार्गेट केल्याने, लष्करासाठी ही चिंतेची बाब आहे.

नुकतंच पोलिसांनी जम्मू काश्मीरमधील जवानांना दक्षिण काश्मीरमध्ये जाताना सुरक्षितता बाळगावी, असा सल्ला दिला होता. दक्षिण काश्मीरमधील पुलवामा, शोपीयान, अनंतनाग आणि कुलगाममध्ये दहशतवादी कारवाया वाढल्या आहेत.

त्यातच स्थानिकांचाही दहशतवाद्यांना पाठिंबा आहे. त्यामुळेच सुरक्षा दलाला दहशतवाद्यांना ठेचण्यास अडथळा निर्माण होत आहे. दोनच दिवसांपूर्वी हिजबूल मुजाहिद्दीनच्या दहशतवाद्यांनी अझर मेहमूद या पोलिसाची हत्या केली होती. अपघातामुळे विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत करताना मेहमूद यांच्यावर फयाझ अहमद या दहशतवाद्याने हल्ला केला होता.