ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

शांत भारताला डिवचू नका, पाकला अमेरिकन सिनेटरचा इशारा

वॉशिंग्टन, दि. १० (वृत्तसंस्था) - अमेरिकेतील एका सिनेटरने पाकिस्तानला भारतीय सैनिक आणि नागरिकांवर आणखी हल्ले झाले तर भारत शांत बसणार नाही, असा इशारा दिला आहे. यासंदर्भात भाष्य डेमॉक्रॅटिक पक्षाचे गटनेते जो क्राऊली यांनी केले आहे. पाक पुरस्कृत दहशतवाद्यांच्या गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या कारवायांमुळे सध्या भारत-पाकिस्तान सीमेवरील वातावरण प्रचंड तणावपूर्ण आहे. ट्रम्प प्रशासनाने ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पाकिस्तानवर दबाव आणला पाहिजे, अशी मागणी क्राऊली यांनी केली. हिंसक आणि कट्टरतावादी दहशतवादी संघटनांना पाकिस्तानने आवर घालण्याची गरज आहे. अन्यथा भारत त्यांच्या सैनिक आणि नागरिकांवर हल्ले होत राहिल्यास शांत बसणार नाही, असे क्राऊली यांनी म्हटले.

द्विपक्षीय चर्चेच्या माध्यमातून या सगळ्या वादावर तोडगा काढण्याची गरज असून अमेरिका या सगळ्यात दोन्ही देशांचा मित्र म्हणून मध्यस्थी करू शकते. अमेरिकेकडून या परिसरात शांतता आणि सलोखा प्रस्थापित करण्यासाठी दोन्ही देशांवर दबाव आणला जाऊ शकतो, असेही क्राऊली यांनी सांगितले. या परिसरासाठीचे धोरण निश्चित करताना भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील ऐतिहासिक संबंधांचा प्रामुख्याने विचार झाला पाहिजे.

ट्रम्प प्रशासनाचे भारत, पाकिस्तान किंवा अफगाणिस्तानसंदर्भात काय धोरण आहे, याची मला कल्पना नाही. पण, जे काही धोरण अमेरिकेकडून ठरवण्यात येईल ते स्पष्ट आणि माझ्यासारख्या या परिसराची काळजी असणाऱ्या लोकांना समजेल, एवढीच आपली आशा असल्याचे क्राऊली यांनी सांगितले. या धोरणात दहशतवादाशी एकत्रित लढा देण्याबरोबरच परिसरात शांतता आणि स्थैर्य प्रस्थापित करण्याच्या मुद्द्यांचा अंतर्भाव असायला पाहिजे, असेही क्राऊली यांनी सांगितले.