ब्रेकिंग न्यूज
उल्हासनगर : रेल्वे स्टेशनबाहेर वडापावच्या दुकान मालकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, चंदरलाल रामरखियानी 100 % भाजले      पाकिस्तानात बेपत्ता झालेले दोन्ही मौलवी भारतात परतले      बेळगावात ड्राय डेच्या दिवशी दारु न दिल्याने पोलिसांची हॉटेल मॅनेजरला लाथा-बुक्क्यांनी मारहाण      नागपूरमध्ये राजू शेट्टी यांचे स्टेट बँक इंडियाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन      पतीची हत्या करुन मृतदेह बीएमडब्ल्यू गाडीत लपवला, पत्नीविरोधात गुन्हा दाखल, पंजाबमधील घटना      उत्तरप्रदेशमध्ये बहुजन समाज पक्षाचे नेते मोहम्मद समी यांची भररस्त्यात हत्या      छत्तीसगडमधील दंतेवाडामधूल पाच नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा हस्तगत      महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना फसवणारा, जनतेला गाजर दाखवणारा अर्थसंकल्पः जयंत पाटील      जळगाव : शहरापासून जवळच असलेल्या भादली गावात मध्यरात्री एका कुटुंबातील चौघांची चोरटयांनी हत्या केली.      मुंबईने गमावला मतदानाचा अधिकार, ईशान्य भारतातील राज्यांना मिळाला BCCI मध्ये मतदानाचा हक्क
...

अॅमेझॉनला लाखांचा गंडा, आरोपी महिला पोलिसांच्या जाळ्यात

बंगळुर, दि. ११ -  ऑनलाईन शॉपिंग कंपनी अॅमेझॉन इंडियाला कथित स्वरुपात जवळजवळ ७० लाख रुपयांना गंडवणाऱ्या एका महिलेला फसवणुकीच्या गुन्ह्याखाली बंगळुरु पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंजिनिअर असलेली आरोपी महिला ही मुळची . बंगालची आहे. ही महिला अमेझॉन इंडिया या ऑनलाईन वेबसाईटवरुन अनेक वस्तू खरेदी करायची. खरेदी केलेली वस्तू खराब असल्याचं सांगत ती पैसे परत घ्यायची. पण ती ज्या वस्तू परत करायची त्या वस्तू अमेझॉन इंडियावरुन खरेदी केलेल्या नसायच्या. तर त्यासारख्या दिसणाऱ्या दुसऱ्या वस्तू ती अमेझॉनला परत करायची. तर अमेझॉनचे चांगले प्रोडक्ट ती इतर ऑनलाईन पोर्टलला विकायची
या महिलेनं अमेझॉनला तब्बल ७० लाखांना गंडवल्याचा आरोप आहे. बनावट नावानं तिनं आतापर्यंत 104 वस्तू खरेदी केल्या होत्या. यामध्ये मोबाइल फोन, कॅमेरा, टीव्ही आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा समावेश होता. या वस्तू मागवल्यानंतर ती २४ तासात त्या परत करुन रिफंड घेत होती. पण तेव्हा ती तशाच दिसणाऱ्या खराब वस्तू परत करायची. ती डिलिव्हरी आणि कलेक्शनसाठी दरवेळेस नवनवीन पत्ता देत होती
बंगळुरुत अशा घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलीस आरोपी महिलेची अधिक चौकशी करत आहेत
.