ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

निर्भया प्रकरणातील चारही दोषी करणार दयेचा अर्ज

नवी दिल्ली, दि. ११ - सर्वोच्च न्यायालयाने निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणात दोषींची फाशी कायम राखल्यापासून चारही दोषींनी तुरुंगातील काम थांबवले असल्याची माहिती सूत्रांनी दिली असून चारही दोषींचे फाशीच्या शिक्षेचे रुपांतर जन्मठेपेत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दोषी फाशीची शिक्षा टाळण्यासाठी राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज करण्याच्या विचारात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

शुक्रवारी निर्भया बलात्कार प्रकरणी दोषींना सर्वोच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली. सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली उच्च न्यायालयाने सुनावलेली फाशीची शिक्षा कायम राखली. फाशीची शिक्षा सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवल्यापासून दोषी निराश झाले आहेत. त्यांनी तुरुंगात काम करणेदेखील थांबवले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. अक्षय ठाकूर, पवन कुमार आणि मुकेश कुमार तिहारमधील क्रमांक दोनच्या तुरुंगात असून विनय शर्मा सात क्रमांकाच्या तुरुंगात आहे.

फाशीची शिक्षा सर्वोच्च न्यायालयाकडून कायम ठेवली जाण्याआधी अक्षय ठाकूर तुरुंगातील पिठाच्या गिरणीत काम करत होता, तर पवन स्टोर कॅन्टिनमध्ये कार्यरत होता आणि मुकेश हाऊसकिपिंगचे काम करायचा. विजय पदवी परीक्षेचा अभ्यास करत असल्याने तो काम करत नव्हता. ते आधी सोबतच्या कैद्यांसोबत, तुरुंग अधिकाऱ्यांसोबत बोलायचे आणि तुरुंगात कामदेखील करायचे. पण ते आता कोणासोबत फारसे बोलत नाहीत आणि कामदेखील करत नाहीत, अशी माहिती सूत्रांनी दिली. तिहारमधील प्रत्येक कैद्याला काम करण्याची संधी दिली जाते. याबद्दल त्यांना दररोज ३०० रुपये मेहनताना दिला जातो.

लवकरच चार दोषींकडून सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाविरोधात पुनर्विचार याचिका दाखल करण्यात येणार असल्याची माहिती दोषींचे वकील . पी. सिंह यांनी दिली. पुनर्विचार याचिका फेटाळण्यात आल्यास दोषी राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज करणार आहेत. निर्भया प्रकरणातील दोषींना धोका असल्याने आधी त्यांना स्वतंत्र्य तुरुंगात ठेवण्यात आले होते. त्यानंतर त्यांना इतर कैद्यांसोबत ठेवण्यात येऊ लागले